मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दोन लाखांची सुपारी, गोळी झाडणारा अटकेत, मुख्य आरोपी फरार

मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दोन लाखांची सुपारी, गोळी झाडणारा अटकेत, मुख्य आरोपी फरार
मनसे पदाधिकारी जमील शेख

ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दुचाकीवरुन गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुख्य आरोपीने जमील यांच्या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे (Accused who shoot on MNS leader jameel shaikh arrested in Lucknow).

चेतन पाटील

|

Apr 03, 2021 | 6:26 PM

ठाणे : ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दुचाकीवरुन गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. संबंधित आरोपीला लखनऊच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. टास्क फोर्सने अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या आरोपीचं नाव इरफान सोनू शेख मनसुरी असं असून यानेच दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यावर गोळी झाडली होती. आरोपी मनसुरीला लखनऊ कोर्टातून ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या ताब्यात दिलं जाणार आहे. त्यानंतर त्याला सोमवारी (5 एप्रिल) ठाणे कोर्टात हजर केलं जाणार आहे (Accused who shoot on MNS leader jameel shaikh arrested in Lucknow).

नेमकं प्रकरण काय?

मनसे पदाधिकारी जमील शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ठाण्याच्या राबोडी परिसरात संबंधित घटना घडली होती. राबोडी येथे त्यांच्या दुचाकीजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी तेथील स्थानिकांनी दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असा दावा केला होता. पण पोलिसांनी याप्रकराची सखोल चौकशी केली असता त्यांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.

घटनेनंतर दोन दिवसात एका आरोपीला बेड्या

पोलिसांनी राबोडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा जमील शेख यांच्या दुचाकीमागे आणखी एक दुचाकी त्यांचा पाठलाग करत असल्याचं दिसून आलं. तसेच या दुचाकीवरील दोघं जणांनी संधी मिळताच शेख यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर मोठ्या शिताफीने तेथून धूम ठोकली. संबंधित सर्व प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला होता. याच सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत एका आरोपीला दोन दिवसात बेड्या ठोकल्या होत्या.

2 लाखांची सुपारी, मुख्य आरोपी फरार

ठाणे पोलिसांच्या युनिट 1 गुन्हे शाखेने 25 नोव्हेंबर 2020 रोजी पहिला आरोपी ठाण्यातील राबोडी येथून अटक केला होता. या आरोपीचं नाव शाहिद शेख असं आहे. तो सध्या ठाणे जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. तर दुसऱ्याला आरोपीला आता लखनऊ येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजून पोलिसांच्या हाती आलेला नाही. मुख्य आरोपीने अटक केलेल्या आरोपींना दोन लाखांची सुपारी दिली होती. घटनेनंतर तो फरार झाला होता. त्याचाच शोध पोलीस घेत आहेत. आरोपीने जमील यांची सुपारी का दिली याबाबतची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही (Accused who shoot on MNS leader jameel shaikh arrested in Lucknow).

संबंधित बातमी : ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें