छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 15 जवान बेपत्ता

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर (Bijapur) येथे ही चकमक झाली. (Sukma encounter 15 jawans missing)

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 15 जवान बेपत्ता
Sukma encounter
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 9:18 AM

नवी दिल्ली : सुरक्षा दल (Security Forces) आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalites) झालेल्या चकमकीत (Encounter) पाच जवान शहीद झाले आहेत. तर 20 जवान जखमी झाले आहे. तर 15 जवान बेपत्ता आहेत. मृतांमध्ये सीआरपीएफचे (CRPF) दोन आणि डीआरजीचे (DRG) तीन जवानांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर (Bijapur) येथे ही चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना तीन नक्षलवादी ठार करण्यात यश आले आहे. सुरेश आणि विक्की असे मृत नक्षलवाद्यांची नावे असून यात एका महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. (Sukma encounter 15 jawans missing Chhattisgarh Police Sources)

पाच जवान शहीद

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर (Bijapur) मधील तर्रेम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिलगेर जंगलात ही चकमक घडली. यात तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. यात पाच जवान शहीद झाले आहेत. तर 20 जवान जखमी झाले आहेत. या ऑपरेशननंतर तब्बल 15 जवान बेपत्ता आहेत. सध्या संपूर्ण परिसरात त्यांचा शोध घेतला जात आहे. यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. डीआरजीचे उपनिरीक्षक दीपक भारद्वाज यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

जखमी जवानांवर उपचार 

या घटनेनंतर 9 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय बिजापूर येथे दोन MI -17 हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. याद्वारे जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. नक्षलवादी बटालियन कमांडर हिडमा यांच्या पथकाचा यात समावेश असल्याचे बोललं जात आहे. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झीराम हिडमा हा सिल्गर गावचा रहिवासी आहे.

“जखमी सैनिकांना चांगले उपचार द्या”

दरम्यान या घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीतील जखमी सैनिकांना चांगले उपचार द्यावे, अशी सूचना दिली आहे. या सर्व सैनिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, असेही मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक डीएम अवस्थी यांनी बिजापूर (Bijapur) मधील सिलगेर जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी झाल्याचे सांगितले होते.

नक्षलविरोधी अभियान

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानात सीटीएफ, डीआरबी, सीआरपीएफ आणि सीओबीआरएचे सुमारे 400 जवान सहभागी आहेत. हे जवान नक्षल विरोधी अभियानासाठी रवाना झाले होते. जंगलात आल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना घेरल्यानंतर ही चकमक उडाली. यापूर्वी नक्षलवाद्यांनी मार्चमध्ये आईडी ब्लास्ट केला होता. त्यात पाच जवान शहीद झाले होते. नारायणपूर येथे जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. डीआरजीचे जवान एक ऑपरेशन यशस्वी करून परत येत असतानाच या बसवर हल्ला करण्यात आला होता. (Sukma encounter 15 jawans missing Chhattisgarh Police Sources)

संबंधित बातम्या :

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद

खाणी आणि खनिजांवरील नवा कायदा संसदेत मंजूर, काय आहेत मोठे बदल?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.