अभिजीत दीपकेंच्या जवळचा माणूस घराचा पत्ता दिला म्हणून खवळला, थेट कोर्टात जाऊन 2 लाख नुकसानभरपाईची मागणी

सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी सध्या जंतरमंतर आंदोलनापासून खूपच चर्चेत आहे. पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी आता महाराष्ट्रातील शाळांचा आणि इतर परीक्षा घोटाळ्यांचा प्रश्न हाती घेतला आहे.

अभिजीत दीपकेंच्या जवळचा माणूस घराचा पत्ता दिला म्हणून खवळला, थेट कोर्टात जाऊन 2 लाख नुकसानभरपाईची मागणी
Abhijeet dipke
| Updated on: Aug 21, 2026 | 11:30 PM

अभिजीत दीपके यांची सीजेपी सध्या चर्चेत आहे. मात्र या सीजेपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ( सीजेपी ) चे सह संस्थापक सौरभ दास मात्र सध्या वेगळ्यात समस्येने त्रस्त आहेत. सध्या इतके त्रस्त आहेत की त्यांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. सौरभ दास यांनी सोशल मीडिया कमेंटेटर अभिजीत अय्यर मित्रा, पॅम्पलेट, लॉ बीट सारख्या काही न्यूज प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया अकाऊंटच्या विरोधात ही याचिका दाखल करीत तक्रार केली आहे. त्यांचे भाड्याने रहात असलेले  निवास स्थान आणि वैयक्तिक माहितीला न्यूज प्लॅटफॉर्मनी सार्वजनिक केल्याने ते संतापले आहेत. त्यामुळे आपल्या प्रायव्हसीचे उल्लंघन झाल्याने दास यांनी २.०१ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे.

सौरभ दास यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करुन विनंती केली आहे की, मित्रा आणि इतरांना त्यांचा रहिवासी पत्ता यापुढे सार्वजनिक करण्यापासून रोखावे आणि पूर्वी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सोशल अकाऊंट वरुन काढून टाकावेत. त्यांनी न्यायालयाला एक्स (X) आणि गूगलला (Google) त्यांची माहिती उघड करणारी सर्व सामग्री काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशीही विनंती केली आहे. अलीकडेच सौरभ दास यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात दास लाखो रुपयांचे मासिक भाडे कसे भरतात  ? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सौरभ दास म्हणाले भाड्याच्या घरात रहातोय

दास यांनी म्हटलेय की ते ग्रेटर कैलाश – १ मध्ये एका घराच्या तळमजल्यावर साल २०२५ पासून भाड्याने रहात आहे. त्याने आरोप लावला की पॅम्फलेटचे प्रतिनिधी परिसरात दाखल झाले जेथे अन्य लोकही भाड्याने राहातात. घराच्या आतपर्यंतची रेकॉर्डिंग केली गेली आणि ५ ऑगस्ट रोजी या व्हिडीओला व्हायरल केले गेले. ज्या व्हिडीओत माझे घर व्हायरल केले गेले त्या व्हिडीओला २.१ मिलियन ( २१ लाख ) व्ह्यूज आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त

याचिकेत दास यांनी सांगितले की मित्रा यांनी लॉ बीटच्या एका कार्यक्रमात माझ्या घराचा पत्ता सार्वजनिक केला आणि चुकीचा दावा केला की याचे भाडे सात लाख आहे. मित्राने अनेक चुकीची माहिती आपल्याबद्दल सांगितली. सौरभ दास यांनी याआधीही मला धमक्या आल्या आहेत. त्यामुळे माझे कुटुंबिय आणि येथे राहाणाऱ्या अन्य लोकांबद्दल मला काळजी वाटत आहे असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us