AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest: अभिजीत दिपके यांची सशर्त सुटका, मग आशुतोष रांका आणि सौरव दास कोठडीत का?

Abhijeet Dipke - Ashutosh Ranka - Sourav Das: मतदार याद्यांमधील कथित घोळ, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांना पोलिसांनी अटक केली आणि हमीपत्रावर सुटकाही केली. मग आशुतोष रांका आणि सौरव दास हे अद्याप कोठडीत का? काय आहे कायदेशीर पेच? काय आहे अंतर?

CJP Protest: अभिजीत दिपके यांची सशर्त सुटका, मग आशुतोष रांका आणि सौरव दास कोठडीत का?
अभिजीत दिपके यांची सशर्त सुटका, मग आशुतोष रांका आणि सौरव दास कोठडीत का?
| Updated on: Oct 18, 2026 | 7:51 AM
Share

CJP Delhi Lahara Do Tiranga Protest: SIR प्रक्रिया, मतदार याद्यांमधील कथित घोळ, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस, इंडिया आघाडीनंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झालेली आहे. आंदोलनाची भूमी दिल्लीच आहे, पण आता आंदोलकाची भूमिकेत सीजेपी आली आहे. परवा लहरा दो तिरंगा मार्चपूर्वीच पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटकेची बातमी धडकली. तर अवघ्या 24 तासात त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीनही मंजूर केला. पण जंतरमंतरवर तिरंगा फडकवण्यासाठी जात असलेल्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक करून तिहार तुरूंगात त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दिपके यांची सुटका मग दास आणि रांका यांना कोठडी का? असा सवाल अनेकांना पडला आहे. काय आहे यामागील कायदेशीर पेच आणि अंतर?

अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांना शुक्रवारी लहरा दो तिरंगा हा मार्च सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आंदोलनस्थळ गाठण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना गाठले. ते कॅनॉट प्लेस सेंट्रल पार्कपर्यंत पोहचूच शकले नाहीत. मग त्यांना 24 तासात मंदिर मार्ग येथील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर शांतता भंग न करण्याच्या अटीवर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. तुरूंगातून बाहेर पडताच त्यांनी सहकाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली.

सौरव दास आणि आशुतोष रांका का तुरूंगात?

तर 10 ऑक्टोबर रोजी आंदोलन हुकल्यानंतर आणि जंतरमंतर हे आंदोलन स्थळातून हटवल्यानंतर सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी तिथे तिरंगा फडकवला. त्यांची यापूर्वी हमीपत्रावर सुटका करण्यात आली होती. पण त्यांनी पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन केले आणि प्रतिबंध झुगारत जंतरमंतरवर या आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला. यापूर्वीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर अटकेची आणि पुढे न्यायालयीन कोठडीची कायदेशीर कारवाई झाली.

कायदेशीर अंतर काय?

अभिजीत दिपके आणि आशुतोष रांका- सौरव दास यांच्यावरील कारवाईत कायदेशीर अंतर आहे. पोलिसांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) मधील कलम 126 आणि कलम 170 अंतर्गत कारवाई केली आहे. कलम 170 हे गुन्हा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक अटकेचे अधिकार देते. तर कलम 126 अंतर्गत दंडाधिकारी शांतता राखण्यासाठी हमीपत्राची मागणी करतात आणि त्याआधारे आंदोलकाची सुटका करतात. दिपके यांना आंदोलनापूर्वीच ताब्यात घेण्यात आले. तर दास आणि रांका यांनी गुपचूप जंतरमंतर हे प्रतिबंधित आंदोलन स्थळ गाठल्याने, नियम मोडल्याने त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागले.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट