AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

’24 तास…’ शाहरूख खानचा फोटो पोस्ट, तुरूंगातून बाहेर पडताच अभिजीत दिपकेंची मोठी प्रतिक्रिया…

CJP Tiranga March Abhijeet Dipke: सीजेपी पक्षाचे सदस्य आशुतोष रांका आणि सौरव दास तुरूंगात असताना इकडे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची 24 तासानंतर जामिनावर सुटका झाली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली. ती व्हायरल झाली आहे.

'24 तास...' शाहरूख खानचा फोटो पोस्ट, तुरूंगातून बाहेर पडताच अभिजीत दिपकेंची मोठी प्रतिक्रिया...
अभिजीत दिपके यांची शाहरूख खान यांचा फोटो पोस्ट करत मोठी प्रतिक्रिया
| Updated on: Oct 18, 2026 | 6:37 AM
Share

CJP Tiranga March Abhijeet Dipke: काँग्रेसनंतर आता दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी आंदोलकाच्या भूमिकेत आहे. गेल्या आठवडाभरापसून 10 ऑक्टोबरपासून आंदोलनाची हाक देऊनही पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांमुळे त्यांना मोठे यश आलेले नाही. विविध कलम आणि नियमांवर बोट दाखवत आंदोलन हाणून पाडण्याचा जोरकस प्रयत्न सुरू आहे. त्यातच दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात लहरा दो तिरंगा मार्चपूर्वीच पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आणि आंदोलनाची हवा काढली. दिपके यांची 24 तासात सशर्त जामीनावर सुटका झाली. तुरूंगातून बाहेर पडताच दिपके यांनी समाज माध्यम प्लॅटफॉर्म X वर एका ओळीची पोस्ट लिहिली. त्यात बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचा फोटो शेअर करत त्याने एक गमंतीशीर पोस्ट केली. ती सध्या तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे दिपकेंची पोस्ट?

काल दिल्लीतील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर दिपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट केली. पठाण चित्रपटातील शाहरूख खानचा लूक असलेला एक फोटो त्याने शेअर केला. “24 तास कोणतेही वायफाय आणि फोनशिवाय तुरूंगातून बाहेर पडताना नेमके कसे वाटते…” अशा आशयाची ही पोस्ट आहे. ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जेन झीचा उद्वेग त्यातून त्यांनी मांडला आहे. मूलभूत अधिकारांसोबत आता इंटरनेटही किती महत्त्वाचे हे त्यांनी अधोरेखित केले आहे.

दिल्लीत काय घडलं?

शुक्रवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात सीजेपीने लहरा दो तिरंगा या आंदोलनाची हाक दिली होती. पोलिसांनी त्यापूर्वीच मार्चला परवानगी नाकारली आणि प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या. तरीही आंदोलन करण्याची भूमिका दिपके यांनी जाहीर केली. त्यानंतर पोलिसांनी करोल बाग येथील निवासस्थानातून अभिजीत दिपके आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांना ताब्यात घेतले होते.

सशर्त जामीन मंजूर

सीजेपीने अगोदर दिपके यांना कुठे ठेवले हे माहिती नसून पोलिसांनी त्यांना गुप्त ठिकाणी ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दिपके यांना अटक केल्याची बातमी धडकली. शनिवारी पोलिसांनी त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. सुनावणीअंती न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. एका वर्षांच्या शांतता ठेवण्याच्या हमीवर त्यांची मुक्तता करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे जंतरमंतर परिसरात आंदोलन केल्याचा ठपका ठेवत यापूर्वी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांच्या कोठडीत तिहार तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. तर 24 तासात अभिजीत दिपके हे बाहेर आले आहेत. या सर्व कारवाईवरून सीजेपीने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट