AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : ‘मला माहिती होते की…’ अभिजीत दिपके यांची अत्यंत बोलकी प्रतिक्रिया , तरुणांना मोठे आवाहन

Abhijeet Dipke Big reaction: लहरा दो तिरंगा मोर्चापूर्वीच 16 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले. काल त्यांची सशर्त सुटका करण्यात आली. तेव्हा दिपके यांनी V-विजयाची खूण दाखवत आनंद व्यक्त केला.

Abhijeet Dipke : 'मला माहिती होते की...' अभिजीत दिपके यांची अत्यंत बोलकी प्रतिक्रिया , तरुणांना मोठे आवाहन
अभिजीत दिपके यांची अत्यंत बोलकी प्रतिक्रिया
| Updated on: Oct 18, 2026 | 10:35 AM
Share

Abhijeet Dipke Big reaction: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांना शनिवारी, 17 ऑक्टोबर रोजी सशर्त जामीन मिळाला. त्यानंतर त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. देशात परत येण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय घेतला तर आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल हे मला माहिती होते. मला माहिती होते की, मला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. अशा गोष्टी, ज्यांच्याबद्दल कोणालाही कधीच काही कळणार नाही. ज्यांच्याबद्दल मी कधीही कोणाशी बोलू शकणार नाही. मला हेही माहिती होते की, मला तुरूंगात जावे लागेल, असे अभिजीत म्हणाले.

माझे भविष्य आता लोकांच्या हातात

CJP संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. “या दरम्यान माझ्या कुटुंबाला अनेक गोष्टी सहन कराव्या लागतील. त्या गोष्टींसाठी मी नेहमी स्वतःला दोषी मानतो. मला हे पण माहिती होते की, मी जे काही करणार आहे, ते काही सोपे काम नाही. मी ज्या रस्त्यावरून जात आहे, कदाचित त्यात मला यशही मिळणार नाही. पण एक गोष्ट मला माहिती होती, की काहीही होवो, पण मी प्रयत्न जरूर करणार.” असे मत अभिजीत दिपके यांनी व्यक्त केले.

‘जे माझ्या देशासाठी, जनतेसाठी करणे योग्य आहे, त्याचा मी सामना करणार. कारण ज्या दिवशी मी भारतात परत येण्याचा मार्ग निवडला होता. त्याच दिवशी मी माझे भविष्य हे या देशातील जनतेच्या हाती सोपवले होते आणि या देशाच्या राज्य घटनेसाठी सोपवले. जय हिंद’, असे दिपके म्हणाले.

आता दोन भावांच्या सुटकेची प्रतिक्षा

तर अभिजीत दिपके यांनी त्यांचे दोन मित्र आशुतोष रांका आणि सौरव दास यांची आठवण ही काढली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांचा उल्लेख केला. त्यांना या पोस्टमध्ये रांका आणि दास यांची लवकर सुटका व्हावी याची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी अभिजीत दिपके लहरा दो तिरंगा हा मोर्चा काढणार होते. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना अटक झाल्याची बातमी धडकली. तर दिपके यांची 24 तासात सशर्त जामीनावर सुटका झाली. तुरूंगातून बाहेर पडताच दिपके सोशल मीडियावर सक्रिय झाले.

Follow Us
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग