AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘केवळ 11 लोकांनाच परवानगी’, CJP च्या तिरंगा मार्चपूर्वी दिल्ली पोलिसांनी…

CJP Lehra Do Tiranga Protest Delhi: दिल्लीत आज सीजेपीकडून लहरा दो तिरंगा आंदोलन असेल. पण त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

'केवळ 11 लोकांनाच परवानगी', CJP च्या तिरंगा मार्चपूर्वी दिल्ली पोलिसांनी...
लहरा दो तिरंगा आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची मार्गदर्शक सूचना
| Updated on: Oct 16, 2026 | 9:22 AM
Share

CJP Lehra Do Tiranga Protest: दिल्ली येथील कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टी शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. आज 16 ऑक्टोबर रोजी सीजेपी लहरा दो तिरंगा मार्च काढणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात हजारो नागरिक, विद्यार्थी, तरुण आणि समर्थक जमण्याची शक्यता आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तर आंदोलनापूर्वी पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. दिल्लीत 27,000 सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे परिसरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटिंग आणि तात्पुरते तारेचे कुंपण घातले आहे.

केवळ 11 लोकांनाच परवानगी

दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना तिरंगा फडकवण्याची परवानगी दिली आहे. पण त्यासाटी अटी आणि शर्ती घातल्या आहेत. तिरंग्याचा अवमान होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. डीसीपी नेहा यादव यांनी गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीतासाठी केवळ 11 लोकांना परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली.

अभिजीत दीपके यांना सुरक्षा

दिल्ली पोलिसांनी माहिती दिली की, कनॉट प्लेस आणि जवळपासच्या परिसरात अगोदरच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या ठिकाणी कलम 163 लागू आहे. याठिकाणी जमावबंदी लागू आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. यामध्ये राणी झासी रस्त्याजवळील झंडेवालान परिसराचाही समावेश आहे. याच परिसरात सीजेपीचे संस्तापक अभिजीत दिपके थांबलेले आहेत.

दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी आणि पोलिस उपायुक्त (डीसीपी) नेहा यादव यांनी माहिती दिली की नवी दिल्ली महानगरपालिकेने त्यांना पत्र दिले आहे. त्यानुसार, कनॉट प्लेस परिसरातील सेंट्रल पार्क परिसर 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी बंद असेल. तर महापालिकेने या परिसरात कोणताही अनुचित प्रकार रोखण्याची आणि वाहनांना प्रवेश न देण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे.

CJP चे जनतेला आवाहन

सीजेपीने समर्थक, नागरिकांना 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता सेंट्रल पार्कमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. याठिकाणी लोकांनी तिरंगा घेऊन पोहचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाने कार्यकर्ते, समर्थकांना सेंट्रल पार्कमध्ये जमा होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Follow Us
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?