AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Tiranga Yatra: 27,000 हजार जवान, कलम 163 लागू, सीजेपीच्या तिरंगा यात्रेपूर्वी दिल्लीची नाकाबंदी…

CJP Lahera do Tiranga Yatra: 10 ऑक्टोबर रोजीचे आंदोलन पोलिसांच्या अभूतपूर्व बंदोबस्ताने तडीस गेले नाही. आज CJP च्या लहरा दो तिरंगा आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. पण त्यापूर्वी पोलिसांनी दिल्लीचे लष्करी छावणीत रुपांतर केले आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी चौकाचौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

CJP Tiranga Yatra: 27,000 हजार जवान, कलम 163 लागू, सीजेपीच्या तिरंगा यात्रेपूर्वी दिल्लीची नाकाबंदी...
सीजेपीच्या तिरंगा यात्रेपूर्वी दिल्लीची नाकाबंदी...
| Updated on: Oct 16, 2026 | 8:36 AM
Share

Abhijeet Dipke CJP Lahera do Tiranga Yatra: अखेर सहा दिवसानंतर दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन होणार आहे. अर्थात हे आंदोलन जंतरमंतर इथं न होता कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्कमध्ये होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि सीजेपी नेते आशुतोष रांका, सौरव दास यांच्या धरपकडीच्या विरोधात लहरा दो तिरंगा रॅली होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व आणि कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात तब्बल 27 हजार सुरक्षा रक्षकांचा गरडा असेल. तर संपूर्ण परिसरात कलम 163 (यापूर्वीचे कलम 144) लागू करण्यात आले आहे.

सीजेपीने सोशल मीडिया आणि पत्रकार परिषद घेत या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तर या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन पक्षाने कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केले आहे. समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आशा आहे. तर या आंदोलनाला आम आदमी पक्षानेही पाठिंबा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. नवरात्रौत्सव, दसरा या सणासुदीच्या काळात सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

कॅनॉट, सेंट्रल पार्क दोन दिवस बंद

दिल्ली महानगरपालिकेने दिल्ली पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. त्यानुसार, प्रशासकीय कारणांमुळे 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क पूर्णपणे बंद असेल. तर या परिसरातील महत्त्वाच्या सरकारी इमारती, व्हीआयपी निवासस्थानं, संवेदनशील ठिकाणं असल्याने लुटियन्स भागात बहुस्तरीय नाकाबंदी, बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. रस्त्यावर बॅरिकेंटीग, सिमेंटचे ब्लॉक आणि काटेरी तारांचे कुंपण उभारण्यात आले आहे. आंदोलकांच्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

27 हजार जवान तैनात, ड्रोनद्वार नजर

दिल्ली पोलिस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे, त्यात CRPF, RAF यांच्यासमावेशासह 27 हजार जवान तैनात करण्यात आली आहेत. चौका चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. संशयितांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. या संपूर्ण परिसरात ड्रोन कॅमेरे आणि उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लक्ष असेल. दिल्लीच्या सीमावर्ती भागात प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.

कलम 163 लागू, जमावास बंदी

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने दिल्लीतील अनेक भागात कलम 163 लागू केले आहे. त्यानुसार, 5 अथवा त्यापैक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना घोळक्याने फिरण्यास मनाई असेल. नागरिकांनी परवानगीशिवाय रॅली, मोर्चा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. शस्त्रास्त्र, लाठ्या-काठ्या बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!