Cloud burst | ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार, अचानक आला पूर, भारतीय सैन्याचे 23 जवान बेपत्ता

Cloud burst | ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सैन्याच्या 23 जवानांचा शोध घेतला जातोय. ढगफुटीमुळे अचानक तीस्ता नदीला पूर आला. कुठे घडली ही धक्कादायक घटना?

Cloud burst | ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार, अचानक आला पूर, भारतीय सैन्याचे 23 जवान बेपत्ता
Flood After Cloud Burst
| Updated on: Oct 04, 2023 | 10:21 AM

नवी दिल्ली : ढगफुटीमुळे गंभीर स्थिती निर्माण झालीय. सर्वत्र हाहाकार उडालाय. अचानक पूर आलाय. त्यात भारतीय सैन्याचे 23 जवान बेपत्ता आहेत. ढगफुटीमुळे तीस्ता नदीला पूर आलाय. सिंगतम भागात ढगफुटीची घटना घडली. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. आधी ढगफुटी झाली. त्यानंतर इतक पाणी वाढलं की, चुंगथांग धरणातून पाणी सोडावं लागलं. त्यामुळे अचानक पाण्याचा स्तर 15-20 ते फूटाने वाढला. सिक्किममध्ये हे सर्व घडलय. उत्तरी सिक्किममध्ये ल्होनक तळ्याच्यावर अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे लाचेन घाटीतील तीस्ता नदीला पूर आला, अशी माहिती गुवाहाटी डिफेन्सच्या प्रवक्त्याने दिली. घाटीतील काही सैन्य संस्थांवर याचा परिणाम झाला. 23 जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. शोधकार्य सुरु आहे. लोचन घाटीतून वाहणाऱ्या तीस्ता नदीला पूर आलाय. घाटीतील काही सैन्य ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेली. 23 जवानांशिवाय आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

तीस्ता नदीला आलेल्या पुरात मेल्लीमध्ये नॅशनल हायवे 10 वाहून गेला. अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे. तीस्ता नदीला लागून असलेला भाग रिकामी करण्यात आला आहे. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पश्चिम बंगाल सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आहे. सिक्कीमच्या गँगटॉक येथून पर्यटकांची सुटका करण्यात येत आहे. हाय एल्टीट्यूड माऊंटनचा हा भाग आहे.


सार्वजनिक संपत्तीच मोठ नुकसान

सिक्किमच्या पुरावर भाजपा नेते उग्येन शेरिंग ग्यात्सो भूटिया यांनी सांगितलं की, सरकारी यंत्रणांच्या मदतीने लोकांचा प्राण वाचवले जात आहेत. सार्वजनिक संपत्तीच मोठ नुकसान झालय. सिंगतम भागात मोठ नुकसान झालय. काही लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.