Devendra Fadnavis : ‘इट्स डन ब्रो, शेवटी मनात होतं ते ओठांवर आलचं’, दीपकेच्या शेजारी बसलेल्या नेत्याच्या वक्तव्यावर अखेर फडणवीस बोलले
Devendra Fadnavis :काल अभिजीत दीपकेंची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. यावेळी दीपकेंच्या शेजारी बसलेला एक नेता मनातलं बोलला. पहिल्यांदाच त्याने ही भूमिका मांडली. त्यावर आता देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी देशात रिजीम चेंज हवा असं म्हटलं आहे. त्यात काही चुकीचं नाहीय असं त्यांचं म्हणणं आहे. गुरुवारी नवी दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये एका पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. त्यावेळी प्रशांत भूषण यांनी हे वक्तव्य केलं. मोदी सरकार देशात निवडणूक लोकशाही चिरडून टाकण्यावर ठाम आहे असं प्रशांत भूषण म्हणाले. त्यावर आता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “इट्स डन ब्रो, सर्वकाही जाहीर झालय. अखेर हे सर्वकाही सत्ता बदलासाठी आहे. शेवटी मनात होतं ते ओठांवर आलच” असं फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. “सर्व खेळ सत्तेची खुर्ची मिळवण्याचा आहे. मग, त्यासाठी विद्यार्थी, शेतकऱ्यांना चिथावणी द्यावी लागली तरी चालेल, जाती, भाषेच्या नावावर द्वेष परसवावा लागला तरी चालेल. देशाच्या प्रतिष्ठीत संस्थांची प्रतिमा मलीन केली जातेय. आंदोलनाच्या आडून अराजकता पसरवण्याचा यांचा उद्देश आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“हे सरकार वारंवार बोलतं की, विरोधी पक्षाकडून हा सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न आहे. आम्ही फक्त देशात निवडणूक लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतोय. ही अशीच क्रूरता सुरु राहिली तर सत्ता परिवर्तन जरुर होईल. आम्हासर्वांना सत्ता परिवर्तन हवं आहे. यात काही चुकीचं आहे का? सत्ता परिवर्तन प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. सरकार विरोधात असंतोष व्यक्त करणं हा गुन्हा नाहीय” असं प्रशांत भूषण म्हणाले.
It’s done bro, everything is exposed !! Afterall, it was all about ‘Regime Change’..
आखिर मन में छुपी बात होठों पर आ ही गई!
सारा खेल सत्ता की कुर्सी पाने का है.. फिर उसके लिए विद्यार्थियों, किसानों को उकसाना ही क्यों ना पडे, जाति और भाषा के नाम पर द्वेष फैलाना पडे, या देश की प्रतिष्ठित संस्थाओं की प्रतिमा मलीन करनी पडे। आंदोलन की आड में अराजकता फैलाना ही ‘इनका’ उद्देश है।
#Maharashtra
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2026
हे आम्हाला बांग्लादेशने शिकवलं
नेहा बोरा, अभिजीत दिपके, एक्टर प्रकाश राज यांच्यासोबत प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषद घेतली. “देशात निवडणूक लोकशाही चिरडण्याची इच्छा असलेलं आणि नागरिकांच्या मौलिक अधिकारांशी खेळणारं सरकार सत्तेवर राहू नये” असं प्रशांत भूषण म्हणाले. “प्रशांत भूषण आणि नेहा बोरा पत्रकार परिषदेत जे बोलले, त्यांच्या बोलण्यातून देशाप्रती गद्दारी दिसून येते, हा खूप आश्चर्यकारक आहे” असं भाजप नेते संबित पात्रा म्हणाले. ‘ही रिजीम चेंजची लढाई आहे. आम्ही रिजीम चेंज करुनच राहणार’ असं प्रशांत भूषण म्हणाले. ‘रिजीम चेंज कशी होते हे आम्हाला बांग्लादेशने शिकवलं आहे’ असे नेहा बोराने म्हटलं.
