रात्री झोपला होता तरुण, अंथरुणात काहीतरी असल्याचे जाणवले म्हणून लाईट लावून पाहिले अन्…

एक युवक नेहमीप्रमाणे रात्री जेवून आपल्या रुममध्ये लाईट बंद करुन झोपी गेला. थोड्या वेळाने त्याला अंथरुणात काहीतरी स्पर्श जाणवला, म्हणून तरुणाने रुममधील लाईट लावून पाहिले.

रात्री झोपला होता तरुण, अंथरुणात काहीतरी असल्याचे जाणवले म्हणून लाईट लावून पाहिले अन्...
अंथरुणात कोब्रा पाहताच तरुणाचा थरकाप
Image Credit source: social
| Updated on: Nov 02, 2022 | 9:56 PM

सागर : साप म्हटले की सर्वांनाच घाम फुटतो. पण हा साप जर तुमच्या शेजारी येऊन बसला तर काय होईल? उत्तर प्रदेशात असीच एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एक युवक नेहमीप्रमाणे रात्री जेवून आपल्या रुममध्ये लाईट बंद करुन झोपी गेला. थोड्या वेळाने त्याला अंथरुणात काहीतरी स्पर्श जाणवला, म्हणून तरुणाने रुममधील लाईट लावून पाहिले. लाईट लावल्यानंतर समोर जे दृश्य दिसले ते पाहून तरुणाचा थरकाप उडाला.

रात्री चादरीत काही हालचाली जाणवल्या

गोविंद प्रजापती असे सदर तरुणाचे नाव आहे. गोविंद रात्री झोपल्यानंतर त्याला चादरीमध्ये काही हालचाली जाणवल्या. अंधारात त्याला काही काय आहे हे कळले नाही, म्हणून त्याने रुममधला वाईट लावला. लाईट लावल्यानंतर अंथरुणात कोब्रा पाहून गोविंदच्या पायाखालची जमीनच सरकली.

सहा फुटी कोब्रा पाहून सर्वांचाच थरकाप उडाला

सागर जिल्ह्यातील सिरोंजा गावात गोविंदचे घर आहे. मंगळवारी घरातील सर्व सदस्य झोपी गेले. यावेळी गोविंद आपल्या रुममध्ये झोपला होता. अंथरुणात सहा फूट कोब्रा पाहून गोविंद जोरात किंचाळत रुमच्या धावत गेला.

गोविंदचा आरडाओरडा ऐकून घरातील सदस्य जागे झाले आणि गोविंदची विचारपूस करु लागले. गोविंदने त्यांना कोब्रा दाखवताच त्यांच्याही तोंडचे पाणी पळाले. कुटुंबातील इतर सदस्यांनीही रुममध्ये पाहिले असता अंथरुणावर कोब्रा बसलेला दिसला.

प्राणीमित्राने कोब्राला जेरबंद केले

यानंतर प्राणीमित्राला संपर्क करण्यात आला. प्राणिमित्राने तात्काळ गोविंदच्या घरी दाखल होत अथक प्रयत्न करत कोब्राला जेरबंद केले. हा सर्वात विषारी साप असून, त्याला जंगलात सुखरुप सोडण्यात आले.