CJP On Delimitation Bill:  ‘युवा माफ करणार नाही’, डिलिमिटेशनवरुन CJPनेही डाव टाकला; विरोधी पक्षांना मोठा इशारा!

तरुणांच्या नेतृत्वाखालील चळवळ मजबूत करणे आणि त्यांचा आवाज बुलंद करणे ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, परंतु त्याऐवजी काही पक्ष भाजपसोबत उभे राहून विधेयक मंजूर करण्यास मदत करत आहेत," असा घणाघातही यावेळी सौरभ दास यांनी केला आहे. 

CJP On Delimitation Bill:  युवा माफ करणार नाही, डिलिमिटेशनवरुन CJPनेही डाव टाकला; विरोधी पक्षांना मोठा इशारा!
CJP News
| Updated on: Nov 29, 2026 | 4:10 PM

CJP On Delimitation Bill:  देशभरात सध्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयक म्हणजेच डिलिमिटेशनवरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. केंद्र सरकारने 30 नोव्हेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात हे विधेयक आणण्याची तयारी सुरु आहे. मात्र इंडिया आघाडीमधील घटकपक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. अशातच आता या विधेयकावरुन कॉक्रोच जनता पार्टीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

डिलिमिटेशनवरुन सीजेपी नेत्याचे मोठे विधान!

Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) नेते व प्रवक्ते सौरभ दास यांनी डिलिमिटेशन विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. या विधेयकाअंतर्गत घेतलेल्या निर्णयांना न्यायालयात आव्हानही देता येणार नाही. याचा अर्थ असा की, जर कोणाला वाटले की मतदारसंघांची पुनर्रचना अन्यायकारकपणे केली जात आहे, तर ते न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडू शकणार नाहीत. हे सर्व केवळ भाजपच्या फायद्यासाठी केले जात आहे, जेणेकरून विरोधी पक्षांना देशातून पूर्णपणे संपवता येईल, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

तसेच “भाजप इतर राजकीय पक्षांतील खासदारांचा घोडेबाजार करत असल्याचा आरोप करत दास यांनी विरोधी पक्ष आणि खासदारांना या विधेयकाला तीव्र विरोध करण्याचे आवाहन केले. या विधेयकाला बिगर-एनडीए पक्षांकडून मिळत असलेल्या पाठिंब्यावर टीका करताना ते म्हणाले की, तरुणांच्या नेतृत्वाखालील चळवळ मजबूत करणे आणि त्यांचा आवाज बुलंद करणे ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, परंतु त्याऐवजी काही पक्ष भाजपसोबत उभे राहून विधेयक मंजूर करण्यास मदत करत आहेत,” असा घणाघातही यावेळी सौरभ दास यांनी केला आहे.

विरोधकांना इशारा

दरम्यान, “जे राजकीय पक्ष  आपल्या देशाला आणि लोकशाहीला उद्ध्वस्त करणारे विधेयक मंजूर करण्यास भाजपला मदत करणार आहेत, त्या सर्वांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यावर नजर ठेवून आहोत. देशातील तरुण पिढी तुमच्यावर नजर ठेवून आहे. आम्हाला राजकीय पक्षांकडून खूप अपेक्षा आहेत की ते लोकशाहीच्या बालेकिल्ल्याचे रक्षण करतील. पण जर तुम्ही या देशाशी गद्दारी केली, तर तरुण पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा इशाराही यावेळी सौरभ दास यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us