चहलनंतर भारताचा हा बडा क्रिकेटर भाजपात जाणार, थेट ते फोटो आले समोर, कोणाला भेटला?
Mohammed Shami BJP : भारतीय स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची आता राजकारणात एन्ट्री होणार आहे. शमीचे काही फोटोही आता समोर आले आहेत.

Mohammed Shmai BJP: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी राजकारणात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. तो भाजपमध्ये सामील होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. शमीने काल रात्री दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. शमी भाजपमध्ये सामील झाल्यास त्याला भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीत मोठी जबाबदारी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.
भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष कुंवर बासित अली यांनी दिल्लीत मोहम्मद शमी आणि नितीन नवीन यांच्या भेटीचे आयोजन केले होते. ही भेट काल रात्री दिल्लीतील नितीन नवीन यांच्या कार्यालयात झाली. मोहम्मद शमी भाजपच्या तिकिटावर अमरोहामधून विधानसभा निवडणूक लढवू शकतो, असेही वृत्त आहे. मोहम्मद शमीने ६ नोव्हेंबर रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता तो राजकारणात आपले नशीब आजमावणार आहे.
Indian cricketer Mohammed Shami meets with BJP National President Nitin Nabin. BJP Minority Morcha President Kunwar Basit Ali was also present during the meeting.
(Pic Source: BJP Minority Morcha) https://t.co/dVfDsGBl1n
— ANI (@ANI) November 29, 2026
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ६ नोव्हेंबर रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपला निर्णय जाहीर करताना शमी म्हणाला की, “भारतासाठी खेळण्याचा त्याला नेहमीच अभिमान वाटेल. मी पांढरी जर्सी सोडत आहे, पण तिच्याशी निगडित आठवणी माझ्यासोबत कायम राहतील. जेव्हा मी पहिल्यांदा भारतीय कसोटी जर्सी घातली, तेव्हा माझे एकच स्वप्न होते: माझ्या देशासाठी काहीतरी करणे. तेव्हापासून आतापर्यंत, प्रत्येक विकेट, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुखापत आणि प्रत्येक पुनरागमनाने मला काहीतरी शिकवले आहे.”
शमी म्हणाला, “माझ्यासाठी कसोटी क्रिकेट केवळ एक प्रकार नाही, तर माझ्या आयुष्याचा एक खूप खास भाग आहे. आज, जड अंतःकरणाने आणि असंख्य सुंदर आठवणींसह, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि या प्रवासात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या व सुख-दुःखात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो भारतीयांचे मनःपूर्वक आभार.”
