Gyanesh Kumar : आज शेवटचा दिवस, कॉक्रोच जनता पार्टीची सकाळीच ज्ञानेश कुमार यांना वार्निंग

कॉक्रोच जनता पार्टीची सकाळीच ज्ञानेश कुमार यांना इशारा दिला आहे. सीजेपीच्या इशाऱ्यानंतर ज्ञानेश कुमार हे काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Gyanesh Kumar : आज शेवटचा दिवस, कॉक्रोच जनता पार्टीची सकाळीच ज्ञानेश कुमार यांना वार्निंग
CJP
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 10:02 AM

एसआयआर प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने थेट आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या या इशाऱ्यानंतर ज्ञानेश कुमार काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने म्हटलं की, सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ुए-क़ातिल में है. तुम्ही तयारीला लागा. आता 2 ऑक्टोबर रोजी भेटू’. कॉक्रोच जनता पार्टीने 48 तासांचा अल्टिमेटम ज्ञानेश कुमार यांना दिला होता. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने 2 ऑक्टोबर रोजी म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीचं औचित्य साधून आंदोलनाची घोषणा केली आहे. यानंतर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगावर आरोप होत असेल, आयोगाने त्यांची बाजू मांडली पाहिजे’.

इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार, मागील 10 महिन्यात दोन निवडणूक आयुक्तांनी ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयांवर आक्षेप घेतला, परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. या रिपोर्टनंतर काँग्रेस पक्षसह सर्व विरोधी पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. देशातील विविध भागात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. देशातील मुख्य शहरात निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चे काढले जात आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने आता निवडणूक आयोग दुरूस्त करा, अशी माोहीम हाती घेतली आहे. अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका यांनी आरोप केला आहे की, एसआयआर प्रक्रियेद्वारे 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 13 कोटींहून अधिक नावे वगळण्यात आली आहे. मतदार यादीतून वगळण्यात आलेले प्रत्येक नाव कायदेशीर, पारदर्शक प्रक्रियेद्वारे वगळण्यात आले आहे, हे निवडणूक आयोगाने सिद्ध करावे, अशी मागणी सीजीपीने केली आहे. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. याचबरोबर एसआयआर प्रक्रियेदरम्यान घेतलेल्या निर्णयाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us