Mallikarjun Kharge: जन-महाभियोगाचा प्रस्ताव का आणला? मल्लिकार्जुन खर्गेंनी सांगितलं खरं कारण; महाराष्ट्राचा उल्लेख करत मोदी सरकारवर हल्लाबोल

Mallikarjun Kharge News: महाभियोग कार्यक्रमात मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारवर मोठी टीका केली आहे.

Mallikarjun Kharge: जन-महाभियोगाचा प्रस्ताव का आणला? मल्लिकार्जुन खर्गेंनी सांगितलं खरं कारण; महाराष्ट्राचा उल्लेख करत मोदी सरकारवर हल्लाबोल
Mallikarjun Kharge
| Updated on: Oct 31, 2026 | 4:38 PM

इंडिया आघाडी मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘जन महाभियोग’ आणत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमासाठी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षनेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यानंतर मल्लिकार्जुन खर्गेंनी संवाद साधला आहे. यात त्यांनी मोठं वक्तव्ये केली आहेत. तसेच सरकारवर टीका केली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार भूषवले. मुख्य निवडणूक आयुक्तांवरील महाभियोग प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार म्हणाल्या की, लोकांना मतदान करण्यापासून रोखणे हा लोकशाहीवरील हल्ला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निष्पक्ष नाहीत, असेही त्या म्हणाल्या. यानंतर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला आहे.

Loading...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित सार्वजनिक महाभियोग प्रस्ताव कार्यक्रमादरम्यान केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्य निवडणूक आयोगाविरुद्ध आपल्या मनात कोणताही वैयक्तिक द्वेष नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांना निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत, परंतु मुख्य निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या सांगण्यावरून काम करत आहे, असे ते म्हणाले. आज मतदानाचा हक्क धोक्यात आला आहे, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण आपली सर्व शक्ती पणाला लावू. एसआयआरच्या नावाखाली लोकांची मते रद्द केली जात असल्याचे त्यांनी म्हटले. बिहारमध्ये एसआयआरचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला. मतचोरीची अनेक प्रकरणे आहेत आणि मृत व्यक्तींचा मतदार यादीत समावेश करण्याचे ते समर्थन करत नाहीत. संविधानाच्या निर्मात्यांनी जात किंवा धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे, असं ते म्हणाले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्याची मागणीही केली. महाराष्ट्रात 40 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. आता मतांची चोरी होत आहे. मतचोरीची अशी शेकडो उदाहरणे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम, 2023 च्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना यात मदत केली जात आहे. 145 विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर डिसेंबर 2023 मध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले. हा कायदा निवडणूक आयुक्तांना आजीवन कायदेशीर संरक्षण देतो, तर भारताचे राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांनाही असे संरक्षण नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us