नरेंद्र मोदी यांनी या देशातील शेतकऱ्यांना विकून टाकलं – नाना पटोले

"अमेरिकेच्या या करारामध्ये देशातील शेतकरी उध्वस्त होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी या देशातील शेतकऱ्यांना विकून टाकलं आहे. म्हणून या कराराचा आम्ही विरोध आणि निषेध करतो" असं नाना पटोले बोलले.

नरेंद्र मोदी यांनी या देशातील शेतकऱ्यांना विकून टाकलं - नाना पटोले
Nana Patole
| Updated on: Feb 04, 2026 | 3:37 PM

“आमचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी पाच जुलै 2025 ला प्रधानमंत्र्यांचा आवडता केंद्रातला मंत्री पियुष गोयल त्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही आता जे काही करत आहात, याचा परिणाम अमेरिकेसमोर झुकावं लागणार. मोदी हे सरेंडर झाले आहेत,पण समोर जी भविष्यवाणी केली होती तीच आता समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी ज्याप्रकारे अमेरिकेच्या तावडीत सापडले आणि त्यांना वाचवण्यासाठी, एकीकडे ट्रम्पने प्रयत्न केले. भारतात महागाई वाढवण्याचे काम केलं” अशी टीका नाना पटोले यांनी केली. “सगळं डिझेल-पेट्रोल व्हेनेझुएलामधून घेतलं जाणार असा करार केला आणि अमेरिकेच्या सगळ्या शेतीमालाला भारतात आणण्याचा करार या ठिकाणी केला आहे” असं नाना पटोले म्हणाले.

अमेरिकेमध्ये हजार हेक्टरवर शेती असते आणि यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे अमेरिकन सरकार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देते. या करारानुसार काल राहुल गांधींनी जी भूमिका मांडली. त्या देशाच्या शेतकऱ्यांचा रक्त,घाम आणि देशाला विकण्याचं काम नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या करारात केलं आहे, तेच वक्तव्य खरं ठरणार आहे. मोदींचे सरकार जेव्हापासून आल तेव्हापासून या देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे” असं नाना पटोले यांनी दावा केला.

आमच्या खासदाराचा आम्ही जाहीर सत्कार करू

“आम्हाला त्यांच्यावर गर्व आहे, शेतकरी आणि देशाच्या हितासाठी आमचा खासदार एकदा नाही अनेकदा सस्पेंड झाला तरी चालेल,कारण जी शिकवण आम्ही आमच्या खासदाराला दिलेली आहे की शेतकरी विरोधी धोरण आणि शेतकऱ्याचा अहित करणारा सरकार जे केंद्रात बसलं आहे. त्याच्या विरोधात तेवढ्याच ताकदीने बोलल पाहिजे. लोकसभा अध्यक्ष एकतर्फी बोलत असतात. आमचे (प्रशांत पडोळे) खासदार नवीन आहेत, मी असतो तर काय केलं असतं हे सगळे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे, आमच्या खासदाराचा आम्ही जाहीर सत्कार करू. अमेरिकेच्या या करारामध्ये देशातील शेतकरी उध्वस्त होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे ” असं नाना पटोले म्हणाले.