Rahul Gandhi | थोडक्यात वाचले राहुल गांधी, बिहारमध्ये गाडीवर दगडफेक

Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने किशनगंजमार्गे बिहारमध्ये प्रवेश केला होता. या यात्रेदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये राहुल गांधी यांच्या कारच नुकसान झालं. ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ आज बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करेल.

Rahul Gandhi | थोडक्यात वाचले राहुल गांधी, बिहारमध्ये गाडीवर दगडफेक
Rahul Gandhi
| Updated on: Jan 31, 2024 | 1:56 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ सध्या बिहारमध्ये आहे. बुधवारी कटिहारमध्ये त्यांनी पदयात्रा केली. राहुल गांधी यांनी लोकांना अभिवादन केलं. या यात्रेदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये राहुल गांधी यांच्या कारच नुकसान झालं. ते थोडक्यात बचावले. राहुल गांधी कारमधून उतरुन बसमध्ये बसले. त्यानंतर प्रशासनाने लोकांना शांत केलं. आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा 18 वा दिवस आहे. राहुल गांधी यांची यात्रा आज बिहारमधून बंगालमध्ये प्रवेश करेल. राहुल यांची ही यात्रा मिर्चाईबारी डीएस कॉलेजकडून लाभामध्ये जनसंवाद करेल. त्यानंतर बंगालच्या दिशेने प्रस्थान करेल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने किशनगंजमार्गे बिहारमध्ये प्रवेश केला होता. बिहारमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली. यात गाडीच्या काचा फुटल्या. प्रदेश काँग्रेसचा दावा आहे.

बिहारच्या भूमीवर अन्यायाविरोधात सुरु असलेल्या न्यायाच्या या महायात्रेला जनतेच भरपूर प्रेम आणि समर्थन मिळतेय असं राहुल गांधी म्हणाले. न्यायाचा हक मिळेपर्यंत ही यात्रा सुरु राहील. ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ आज बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करेल. यावेळी बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याकडे राष्ट्रीय ध्वज सोपवला.

दुसऱ्यांदा बंगालमध्ये प्रवेश

ही यात्रा दुसऱ्यांदा बंगालमध्ये प्रवेश करत आहे. याआधी 25 जानेवारीला राहुल गांधी यांची न्याय यात्रा बंगालमध्ये पोहोचली होती. यात्रा आसाममधून बंगालच्या कूच बिहारला पोहोचली होती. या दरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की, “पश्चिम बंगालमध्ये येऊन मी खूश आहे. इथे आम्ही तुमच म्हणण ऐकायला आणि तुमच्यासोबत उभ राहण्यासाठी आलो आहे” राहुल गांधी असही म्हणाले होते की, “आम्ही यात्रे दरम्यान न्याय शब्द यासाठी जोडला आहे, कारण देशभरात अन्याय व्याप्त आहे”