COVID-19 Vaccine Emergency Usage | भारतात ऑक्सफर्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळणार की नाही?, दोन आठवड्यात निर्णय

| Updated on: Dec 08, 2020 | 10:33 AM

एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेली कोरोना विषाणूवरील लशीला भारतात आपातकालीन वापरावर मंजुरी मिळणार की नाही यावर येत्या दोन आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे

COVID-19 Vaccine Emergency Usage | भारतात ऑक्सफर्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळणार की नाही?, दोन आठवड्यात निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने (COVID-19 Vaccine Emergency Usage) तयार केलेली कोरोना विषाणूवरील लशीला भारतात आपातकालीन वापरावर मंजुरी मिळणार की नाही यावर येत्या दोन आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकांना लशीचे दोन डोज दिल्यानंतर जे परिणाम आले आहेत त्याआधारे एस्ट्राजेनेकाने भारताकडे परवानगी मागितली आहे (COVID-19 Vaccine Emergency Usage).

एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डची लशीचे पूर्ण डोज म्हणजेच दोन डोज दिल्यानंतर ही लस 62 टक्के प्रभावी असल्याचं निदर्शनास आलं आहे. तर अर्धा डोज दिल्यानंतर ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं जात आहे. ब्रिटनमध्ये चुकीने अर्थवट डोज देण्यात आला होता. ब्राझीलमध्ये हा डोज देण्यात आला होता. पण, भारतात याची चाचणी करताना पूर्ण डोज देण्यात आला आहे.

भारतात एस्ट्राजेनेकाच्या कोरोना लशीची चाचणी सीरम इंस्टिट्युट करत आहे. या लशीच्या उत्पादनाची जबाबदारीही सीमरवर आहे. कुठल्याही लशीला परवानगी देण्यापूर्वी ती 50 टक्के प्रभावी असणे गरजेचं आहे.

भारतात ऑक्सफर्डसोबतच फायझर कंपनीनेनी त्यांच्या लशीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. त्याशिवाय, भारत बायोटेक कंपनीनेही सोमवारी स्वदेशी कोरोना लशीला आपातकालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) विनंती केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बुधवारी याविषयी बैठक होईल. यामध्ये तीन लस उमेदवार पीफायझर, सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेकने बनवलेल्या लशीच्या आपातकालीन वापरावरील अर्जाचे पुनरावलोकन केले जाईल.

COVID-19 Vaccine Emergency Usage

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | पुण्यात रशियाच्या लसीचं दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, या चाचण्या घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

‘कोव्हॅक्सिन’ची लस घेऊनही कोरोना संसर्ग, निष्काळजीच्या दाव्यांवर अनिल विज यांचं स्पष्टीकरण

देशातील ‘या’ राज्यात 2 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या, परिस्थिती नियंत्रणात?