Corona Vaccine | पुण्यात रशियाच्या लसीचं दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, या चाचण्या घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

रशियाची स्फुटनिक फाईव्ह (Sputnik V) लसीची दुसरी मानवी चाचणी पुण्यात घेण्यात आली आहे. पुण्यातील 17 स्वयंसेवकांना या लसीच्या (Corona Vaccine) दुसऱ्या चाचणीचा पहिला डोस देण्यात आला.

Corona Vaccine | पुण्यात रशियाच्या लसीचं दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, या चाचण्या घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

पुणे : रशियाची स्फुटनिक फाईव्ह (Sputnik V) लसीची दुसरी मानवी चाचणी पुण्यात घेण्यात आली आहे. पुण्यातील 17 स्वयंसेवकांना या लसीच्या (Corona Vaccine) दुसऱ्या चाचणीचा पहिला डोस देण्यात आला. स्फुटनिक फाईव्ह लसीची हडपसर परिसरातील नोबेल हॉस्पिटलमध्ये चाचणी पार पडली. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार (3 ते 5 डिसेंबर) या 3 दिवसात 17 स्वयंसेवकांना या लसीचे डोस देण्यात आले, अशी माहिती नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. के. राऊत यांनी दिली. स्फुटनिक फाईव्ह यांचा भारतातील डॉ. रेड्डीजसोबत करार झाला आहे (Russia Corona vaccine Sputnik V human trial second phase Pune).

राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस देण्यात येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय देखरेखीत ठेवलं जाणार आहे. दरम्यान वैद्यकीय लक्षणांची तपासणी देखील केली जात आहे. विशेष म्हणजे लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. “कोरोना लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. देशातील हे कदाचित पहिलं रुग्णालय आहे जेथे कोरोना लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. आम्ही पुढील काही दिवसांपर्यंत कोरोना लस घेणाऱ्या स्वयंसेवकांचं निरिक्षण करणार आहोत. यानंतर कोरोना लस उत्पादकांना याचा अहवाल पाठवला जाईल,” अशी माहिती नोबेल रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेत लस निर्मिती

ही कोरोना लस रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने तयार केली असली, तरीही भारतात या लसीचं उत्पादन हैदराबादमध्ये मुख्यालय असलेल्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेत होत आहे. याचं वितरणही त्यांच्याकडूनच होत आहे.

’कोरोना लस स्वयंसेवकांचं वय किमान 18 वर्षे असणं बंधनकारक’

नोबल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “लसीच्या चाचणी करताना काही महत्त्वाच्या प्रोटोकॉलची विशेष काळजी घेतली जात आहे. यात स्वयंसेवकांच्या वयासह अनेक गोष्टींवर लक्ष दिलं जात आहे. प्रोटोकॉलनुसार स्वयंसेवकाचं वय कमीतकमी 18 वर्षे असणं आवश्यक आहे. ते अगदी ठणठणीत असावेत त्यांना कोणताही आजार नसावा.”

“याशिवाय स्वयंसेवकांकडून अँटीबॉडी आणि कोविड-19 टेस्टसाठी देखील नमुने घेतले जात आहेत. त्याची डॉ रेड्डी प्रयोगशाळेकडून तपासणी केली जात आहे. चाचणीदरम्यान लसीचे 2 डोस दिले जातील. स्वयंसेवकांची पूर्ण माहिती तपासूनच आम्ही मागील 3 महिन्यांमध्ये 17 स्वयंसेवकांना लस दिली,” अशीही माहिती देण्यात आली.

लसीच्या काळाबाजाराचा धोका

गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीणा म्हणाले, “एकदा संपूर्ण देशात कोविड-19 लसीकरण सुरु झालं की लसीच्या काळाबाजाराचा धोका वाढणार आहे. या प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.”

हेही वाचा :

‘कोव्हॅक्सिन’ची लस घेऊनही कोरोना संसर्ग, निष्काळजीच्या दाव्यांवर अनिल विज यांचं स्पष्टीकरण

देशातील ‘या’ राज्यात 2 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या, परिस्थिती नियंत्रणात?

Corona | मॉडर्ना वॅक्सीन मानवी शरीरात 3 महिन्यात बनवू शकते अँटीबॉडी, रिसर्चमध्ये दावा

Russia Corona vaccine Sputnik V human trial second phase Pune

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI