मोठी बातमी: ‘या’ लोकांना दोन डोसची गरज पडणार नाही; भारत कोरोना लसीकरणाची रणनीती बदलणार?

त्यांच्यासाठी लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून पुढे आली आहे. | covid vaccine

मोठी बातमी: 'या' लोकांना दोन डोसची गरज पडणार नाही; भारत कोरोना लसीकरणाची रणनीती बदलणार?
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 11:56 AM

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न पडलेल्या भारताच्यादृष्टीने एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना कोरोना लसीच्या (Covid vaccine) दोन मात्रा देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून पुढे आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने ( Penn institute of immunology)यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. (Patients recover from coronavirus does not need 2 doses of covid vaccine)

त्यामुळे आता भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात कोरोना लसीकरणाची रणनीती बदलली जाणार का, हे पाहावे लागेल. देशातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

लसीकरण केंद्राचा मेसेज आल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं आवाहन

या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांसह स्वतंत्र पदभार असलेले आणि राज्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत विविध राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजनची स्थिती, लसीकरणाची प्रगती आणि औषधींचा साठा या मुद्द्यावर चर्चा केली जाणार असल्याचे समजते. तसेच या बैठकीत कोरोना लसीकरणासंदर्भात काही नवी रणनीती ठरवली जाणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

रायगडमध्ये 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस; इंजेक्शन्सचा वापर थांबवण्याचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनबाबत (Remdesivir injection )एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या:

राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांचं मोठं विधान

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करा; ‘आप’ आमदाराच्या मागणीला भाजपचे समर्थन

माणुसकीची मिठी आणि जिव्हाळ्याची साथ, हंबरडा फोडणाऱ्या गर्भवतीला डॉक्टरचा शब्द, ताई घाबरु नको!

(Patients recover from coronavirus does not need 2 doses of covid vaccine)

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.