लसीकरण केंद्राचा मेसेज आल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं आवाहन

लसीकरण केंद्राकडून लघुसंदेश प्राप्त झाल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे (BMC Mayor Kishori Pednekar on Vaccination).

लसीकरण केंद्राचा मेसेज आल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं आवाहन
मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर


मुंबई : कोवीन ॲपवर नोंदणी झाल्यानंतर संबंधित लसीकरण केंद्राकडून लघुसंदेश प्राप्त झाल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. कांजुर (पूर्व) येथील परिवार महापालिका इमारतीमध्ये असलेल्या तसेच भांडुप (पश्चिमच्या) सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह येथील लसीकरण केंद्राचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज पार पडले. त्यानंतर गोरेगाव येथील नेस्को लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या (BMC Mayor Kishori Pednekar on Vaccination).

ज्येष्ठ नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो : महापौर

कोविन ॲपवर नागरिकांनी लसीकरणाची नोंदणी केल्यानंतर संबंधित लसीकरण केंद्राकडून लघुसंदेश प्राप्त झाल्यानंतरच तसेच लसीची उपलब्धता याची खातरजमा केल्यानंतरच नागरिकांनी घराबाहेर पडणे योग्य राहील. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. ही खबरदारी घेऊनच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले (BMC Mayor Kishori Pednekar on Vaccination).

‘नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावं’

सद्यस्थितीत लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महापालिका नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन करीत आहे. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करणे गरजेचे आहे.

’15 मे पर्यंत दुसरा डोज घेणाऱ्यांना प्राधान्य’

प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद असेल तरच लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ होणार नाही, असे आवाहनही महापौरांनी केले आहे. त्यासोबतच राज्य सरकारकडून 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाबाबतची तारीख जाहीर झाल्यानंतर याबाबतचे नियोजन करण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले. सद्यस्थितीत 15 मे 2021 पर्यंत लसीकरणाचा दुसरा डोज घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. या संपूर्ण लसीकरण मोहिमेत मुंबईकर नागरिक सहकार्य करतील, असा मला विश्‍वास असल्याचे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा : कोरोनाने वडील गेले, तीन काकाही वारले, डॉक्टर तरुणीचा आरोग्यसेवेचा वसा कायम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI