कोरोनाने वडील गेले, तीन काकाही वारले, डॉक्टर तरुणीचा आरोग्यसेवेचा वसा कायम

नांदेडच्या डॉ. मसरत सिद्दीकी यांचे वडील आणि तीन काकांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. (Nanded COVID Warrior Doctor )

कोरोनाने वडील गेले, तीन काकाही वारले, डॉक्टर तरुणीचा आरोग्यसेवेचा वसा कायम
डॉक्टर मसरत सिद्दीकी

नांदेड : कोरोनामुळे तिच्या डोळ्यांदेखत वडिलांनी प्राण सोडले, वडिलांपाठोपाठ घरातील तीन काकाही कोरोनाने गिळंकृत केले, तरीही तिची आरोग्य सेवा सुरुच आहे. ही कहाणी आहे नांदेडच्या डॉक्टर मसरत सिद्दीकी या युवतीची. वडिलांनी दिलेल्या प्रेरणेतूनच आपण रुग्णसेवा करत असल्याचं ती सांगते. (Nanded COVID Warrior Doctor Masrat Siddiqui Patient Care after Father Uncles Death)

कुटुंबात कोरोनाचा संसर्ग

देशभरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. नांदेडच्या डॉ. मसरत सिद्दीकी यांचे वडील आणि तीन काकांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. तिची आई, मोठा भाऊ, वहिनी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

डॉक्टर मसरत नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मॅनेजर पदावर कार्यरत आहे. त्यामुळे डॉक्टरांसोबतच रुग्णांना सांभाळण्याचं दुहेरी काम ती करते. कोरोना संसर्गानंतर तिच्या डोळ्यांदेखत वडिलांचा जीव गेला. त्यांच्या पाठोपाठ घरातील तीन काकाही कोरोनाने मृत्युमुखी पडले. मात्र तिने आरोग्यसेवेच्या व्रतात खंड पडू दिला नाही.

रुग्णालयातील वरिष्ठांचा पाठिंबा

कुटुंबीय आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांनी आपल्याला मोठा पाठिंबा दिला. त्यामुळे खचून न जाता मी वैयक्तिक दुःखावर मात करु शकले. रुग्णालयातील वरिष्ठांनी धीर आणि प्रोत्साहन दिल्याने ते माझे प्रेरणास्थान ठरले आहे. वडिलांनी दिलेल्या प्रेरणेतून आपण रुग्णसेवा करत असल्याचे ती सांगते. डॉक्टर मसरतचे रुग्णांबाबत समर्पण पाहून सकारात्मक ऊर्जा मिळते.

संबंधित बातम्या :

सासऱ्यांपाठोपाठ पतीचाही कोरोनाने मृत्यू, चीनहून पत्नीचा व्हिडीओ कॉलमधून अखेरचा निरोप

पेपर टाकणारा तरुण इंजिनिअर झाला, लग्नही ठरलं, कोरोनाने भरल्या ताटावरुन 24 वर्षांच्या शुभमला नेलं

(Nanded COVID Warrior Doctor Masrat Siddiqui Patient Care after Father Uncles Death)

Published On - 4:27 pm, Thu, 29 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI