‘टरबुजाचं काय करायचं…’, उद्धव ठाकरे यांची सोलापुरात सडकून टीका

"शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही त्या तक्तावर बसला. आता सोबत नाही म्हणून तुम्ही बसू शकत नाही. बसू देणार नाही. संकटकाळी मदत करणाऱ्या शिवसेनेला नकली सेना म्हणता. भाजपची भेकड पार्टी झाली आहे. टरबुजाचे काय करायचं तुम्हाला माहिती आहे. जे टरबूज असते ते उन्हाळ्यात कामी येतं हे तसं नाही", अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

'टरबुजाचं काय करायचं...', उद्धव ठाकरे यांची सोलापुरात सडकून टीका
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 10:18 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापुरात जाहीर सभा पार पडली. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची आज सोलापुरात जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. “नकलीसेना बोलल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोडणार नाही. मोदी उद्या धाराशिवला येत आहेत. माझी मागणी आहे की, भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या. आजपर्यंत तुम्ही भवानी मातेचे दर्शन घेतले नाही. किमान नाव घ्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुम्ही बोलला नाहीत तर आमचे लोक समजून जातील आणि बोललात तर निवडणूक आयोगाला सांगा. शिवसेनेचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मोदी हिमालयात किंवा रेल्वे स्टेशनवर असाल, शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला वाचवले. अटल बिहारी तुम्हाला कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते. शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही त्या तक्तावर बसला. आता सोबत नाही म्हणून तुम्ही बसू शकत नाही. बसू देणार नाही. संकटकाळी मदत करणाऱ्या शिवसेनेला नकली सेना म्हणता. भाजपची भेकड पार्टी झाली आहे. टरबुजाचे काय करायचं तुम्हाला माहिती आहे. जे टरबूज असते ते उन्हाळ्यात कामी येतं हे तसं नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘अश्वमेधाला घोडा लागतो, मात्र हे खेचर’

“2014 आणि 2019 मध्ये मोदीजींचा आम्हाला अभिमान होता. एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी. रवीश कुमार यांनी एक व्हिडिओ टाकला आहे. मोदीजी मी माझ्या सात पिढ्यांचा इतिहास मांडतो. तुम्ही तुमचा इतिहास मांडा”, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. “अश्वमेधाला घोडा लागतो. मात्र हे खेचर आहे गाढव म्हणा, काहीही म्हणा. घटना बदलायला हात लावून दाखवा पूर्ण देश पेटून उठेल”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘आरक्षणाचा निर्णय लोकसभेत का घेतला नाही?’

“आरक्षण बदलण्याला आपला आक्षेप आहे तर मग पाच वर्षात महाराष्ट्रात आरक्षण मागणाऱ्यांना आरक्षण का दिले नाही? 50 टक्क्याच्या वरील आरक्षण देणे हे लोकसभेच्या हातात आहे. आरक्षणाचा निर्णय लोकसभेत का घेतला नाही? हे मोदींनी उद्या सांगावं”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

“साध्या कुटुंबात जन्मलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा माणूस एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो? ही यांची पोटदुखी आहे. भाजप म्हणजे ब्रह्मदेव नाही, भाजपमध्ये हिंदुत्व तेच राष्ट्रीयत्व असं होणार नाही. शिवसेनेला नकली बोलायला ते तुमची डिग्री नाही ती असली शिवसेना आहे. शिवसेनेचा दणका काय असतो हे 4 जूनला मतपेटी उघडल्यावर कळेल”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ.
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?.
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु.
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री.
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व.
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार.
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?.
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक.
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु.