AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचा इतिहास माहिती आहे ना…! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने थेट पाकिस्तानला दिला इशारा

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशविदेशातील खेळाडू आपआपल्या फ्रेंचायझीसोबत एकत्र आले आहेत. असं असताना मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रूजू झालेल्या अल्लाह गजनफरने पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे.

आमचा इतिहास माहिती आहे ना...! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने थेट पाकिस्तानला दिला इशारा
आमचा इतिहास माहिती आहे ना...! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने थेट पाकिस्तानला दिला इशाराImage Credit source: PTI
| Updated on: Mar 18, 2026 | 4:39 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या तयारी अजूनही अर्धवट राहिली आहे. मोक्याच्या क्षणी खेळाडू पाठ फिरवताना दिसत आहेत. त्यामुळे धावाधाव सुरू आहे. असं असताना पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या कमी होताना दिसत नाही. शेजारी असलेल्या अफगाणिस्तानवर हल्ले चढवून निष्पाप लोकांचा बळी घेतला जात आहे. पाकिस्तानच्या एअरफोर्सने अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमधील एक रूग्णालयावर बॉम्ब टाकले. यामुळे 400हून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानच्या या कृतीनंतर अफगाणिस्तान सरकार आणि क्रिकेटपटू यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. राशिद खान, रहमनुल्लाह गुरबाज यासारख्या अफगाणिस्तानच्या दिग्गज खेळाडूंनी टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, युवा खेळाडूही मागे नाही. मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अफगाणिस्तानचा फिरकीपटू अल्लाह गजनफर याने थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे.

फिरकीपटू अल्लाह गजनफर याने सांगितलं की, संपूर्ण जगाला अफगाणिस्तानचा इतिहास माहिती आहे. न्यूज 18 दिलेल्या मुलाखतीत अल्लाह गजनफर म्हणाला की, ‘अफगाणिस्तानच्या त्या गरीब लोकांकडे उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. पाकिस्तानने अशा जागी हल्ला करत आहे. अफगाणिस्तानचे लोकं हे कधीच सहन करणार नाहीत. मला माहिती की पाकिस्तान असं करून काय सिद्ध करून दाखवत आहे. ते सामन्य लोकांवर हल्ला करत आहेत.’ दुसरीकडे, पाकिस्तानला इशारा देत स्पष्ट केलं की, सर्वांना अफगाणिस्तानचा इतिहास माहिती आहे. इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर पाकिस्तानसाठी खूपच वाईट असेल.

गजनफर पहिल्यांदाच आयपीएल खेळणार

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने अल्लाह गजनफर याच्यासाठी बोली लावली आणि संघात घेतलं. त्याच्या फिरकीची संपूर्ण जगात चर्चा आहे. एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्याचं वय सध्या 19 वर्षे असून 14 वनडे सामन्यात 23 ठआणि 5 टी20 सामन्यात 2 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट फक्त 6 धावा प्रति षटक आहे. अल्लाह गजनफर याने एकूण 63 टी20 सामने खेळले असून 77 विकेट घेतल्या आहेत. त्याने आयएलटी20, टी20 ब्लास्ट आणि सीपीएल स्पर्धेत भाग घेतला होता.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल