AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी केकेआरचा खेळाडू अडचणीत, पत्रकारासोबत राडा आणि थेट बोर्डाकडे तक्रार

IPL 2026, Kolkata Knight Riders: आयपीएल 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी फ्रेंचायझी कसून सराव करत आहेत. असं असताना कोलकाता नाईट रायडर्सचा एक स्टार खेळाडू अडचणीत आला आहे. झालं असं की...

IPL 2026 स्पर्धेपूर्वी केकेआरचा खेळाडू अडचणीत, पत्रकारासोबत राडा आणि थेट बोर्डाकडे तक्रार
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी केकेआरचा खेळाडू अडचणीत, पत्रकारासोबत राडा आणि थेट बोर्डाकडे तक्रारImage Credit source: KKR Twitter
| Updated on: Mar 18, 2026 | 3:54 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आता मोजून 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक फ्रेंचायझी जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून जोरदार सराव करत आहेत. काही फ्रेंचायझींची मागच्या पर्वात सुमार कामगिरी राहिली होती. त्याची कसर भरून काढण्याचा यंदाच्या पर्वात प्रयत्न आहे. असं असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे. केकेआरचा एक खेळाडू अडचणीत आला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन आहे. त्याच्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने 25.20 कोटी मोजले असून संघात घेतलं आहे. पण हा स्टार खेळाडू आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात..

कॅमरून ग्रीन ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या देशांतर्गत शेफील्ड शील्ड स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेतील एका सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत ग्रीनने ऑस्ट्रेलियन पत्रकाराशी वाद घातला. त्यामुळे चर्चेत आला आहे. सिडनीत पार पडलेल्या वेस्ट ऑस्ट्रेलिया आणि न्यू साउथ वेल्स या सामन्याच्या निकालानंतर ही घटना घडली. या सामन्यात ग्रीनचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने 135 धावांची शतकी खेळी केली. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केलेल्या कामगिरीनंतर हे पहिलं शतक आहे. सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर मीडियाला कॅमरूनसोबत संवाद साधण्यासाठी बोलवलं गेलं. पण कॅमरून ग्रीन या पत्रकार परिषदेला उशिरा आला. इतकंच काय तर मुलाखत पटापट आटपण्यास सांगितलं.

कॅमरून ग्रीनने यावेळी फॉर्मात परतल्याने आनंदी असल्याचं सांगितलं. इतकंच काय तर संघाच्या विजयाची इच्छाही व्यक्त केली. पण जेव्हा पत्रकारांनी ग्रीनला फलंदाजीच्या संघर्षाबाबत विचारले तेव्हा त्याने उत्तर देण्यास नकार दिला. ही मुलाखत फक्त 1 मिनिटं चालली आणि वेळ फुकट गेला असं सांगत निघला. पण त्याला पत्रकाराने अडवलं आणि दिवसभर आम्ही वाट पाहात होतो असं सांगितलं. तेव्हा ग्रीन उद्धटपणे म्हणाला की, तुम्ही मलाच का लक्ष्य करत आहात? वाद वाढत असल्याचं पाहून सहाय्यक प्रशिक्षक ब्यू कॅसन यांनी उडी घेतली. तसेच पत्रकारांची माफी मागितली. ग्रीन निघून गेल्यानंतर प्रकरण शांत झालं. पण काय घडलं त्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला माहिती देण्यात आली आहे. आता बोर्ड काय कारवाई करते? याकडे लक्ष असेल.

Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...