‘संशोधक काय गवत उपटत बसले होते का?’, ठाकरेंचा सोलापुरात घणाघात

"जे दोघं दादागिरी करत फिरत आहेत ते निवडून आले पाहिजेत. मात्र उर्वरित सर्व इंडिया आघाडीचे खासदार संसदेत बसले पाहिजे. एका व्यक्तीच्या हातात देश दिला तर जो आज हुकूमशाहा बनला आहे तो उद्या जुलमी हुकूमशाह बनेल", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

'संशोधक काय गवत उपटत बसले होते का?', ठाकरेंचा सोलापुरात घणाघात
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 10:05 PM

काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सोलापुरात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्षावर सडकून टीका केली. “टरबूज म्हणजे कोण? मी ज्यांना फडतूस म्हणालो तेच का ते? मोदीजींनी आपल्याला लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो. मग संशोधक काय गवत उपटत बसले होते का?”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. “मोदीजींनी लस दिली असेल. पण गावागावात जाऊन महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेने ती लोकांपर्यंत पोहोचवली. महाराष्ट्र कसा वाचला माहिती आहे का? कारण देशात नंबर वन मुख्यमंत्री म्हणून मला सांगितले होते. पण ते माझ्यामुळे नव्हे तर तुम्ही समोर बसलेल्या लोकांमुळे झाले. मोदीजी लस तुम्ही दिली नाही लस माझ्या महाराष्ट्रात बनली. लस मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्राला किती विनवण्या कराव्या लागल्या?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“जे दोघं दादागिरी करत फिरत आहेत ते निवडून आले पाहिजेत. मात्र उर्वरित सर्व इंडिया आघाडीचे खासदार संसदेत बसले पाहिजे. एका व्यक्तीच्या हातात देश दिला तर जो आज हुकूमशाहा बनला आहे तो उद्या जुलमी हुकूमशाह बनेल. यांनी नवीनच काढले की इंडिया आघाडी पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवणार. सरकार कसं चालवायचं ते आम्हाला माहिती आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

उद्धव ठाकरेंनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “मी त्याच्यावर बोलणार नाही. त्याची हजामत करायला तुम्ही आहात. ज्याला दिल्लीतून चाव्या दिल्या जातात त्यावर मी बोलणार नाही. समोरचा उमेदवार कोण आहे माहिती नाही, बाहेरून पार्सल आणले म्हणतात. बाहेरून आलेले उमेदवार आहेत. त्यांची निर्यात करून टाका. जे बाहेरचे पार्सल येतात त्यांना सांगा सोलापूरकर समर्थ आहे. मला भैय्या देशमुख भेटले. ते पाठिंबा द्यायला आले आहेत. हात वर करून सांगा समोरच्याचे डिपॉझिट जप्त करून प्रणितीला निवडून देणार. मी विजय सभेला येऊ का? विजय झाल्यावर मी तुमच्या दर्शनाला येईल”, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं वचन अमित शाहांना सांगितले. मात्र त्यांनी ते वचन मोडले. अमरावतीच्या उमेदवाराच्या जातीचा प्रश्न कसा सोडवला? तसा सोलापूरच्या खासदारांचा प्रश्न का सोडवला नाही? माझी स्वामीजींना विनंती आहे की, तुम्ही भाजीपाला शाप द्या. काश्मीरमधून 370 कलम काढले तरीही एकही काश्मिरी पंडित काश्मीरमध्ये का जाऊ शकला नाही?”, असा सवाल ठाकरेंनी केला.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.