IPL 2024, MI vs LSG : मुंबई लखनौ सामन्यात हे 11 खेळाडू बजावतील महत्त्वाची भूमिका, जाणून घ्या कोण ते
आयपीएल 2024 स्पर्धेतील 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. हा सामना केवळ औपचारिक असणार आहे. कारण मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर लखनौचा नेट रनरेट पाहता प्लेऑफ गाठणं कठीण आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेतील 65वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. हा सामना क्रीडाप्रेमींसाठी फक्त एक मेजवानी असणार आहे. कारण या सामन्यातून गुणतालिकेवर फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही. त्यामुळे या सामन्यात जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळेल अशी आशा क्रीडाप्रेमींना आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. कारण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी एकदम निराशाजनक राहिली आहे. मुंबई इंडियन्स 13 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. त्यामुळे विजयाने या सामन्याचा शेवट गोड करण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न आहे. लखनौ सुपर जायंट्सला प्लेऑफची तशी संधी आहे. पण ते गणित जुळणं खूपच कठीण आहे. कारण लखनौ सुपर जायंट्सचा नेट रनरेट खूपच निगेटीव्ह आहे. तो रिकव्हर करून प्लसमध्ये येणं शक्य नाही. असं असलं तरी या सामन्याचा विचार करत काही खेळाडू जबरदस्त प्रदर्शन करू शकतात.
मुंबई इंडियन्सकडून पाच खेळाडू, तर लखनौ सुपर जायंट्सच्या 6 खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंकडून सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून केएल राहुल, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, कृणाल पांड्या, मोहसिन खान आणि नुवान तुषारा यांचा समावेश आहे. तर मुंबई इंडियन्सकडून इशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स: हार्विक देसाई (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेयर्स: नुवान तुषारासाठी देवाल्ड ब्रेविस
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान
इम्पॅक्ट प्लेयर्स: मोहसिन खानसाठी आयुष बडोनी