Thackeray Alliance : BMC निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडकली आहे. मनसेने जागा वाटप पूर्ण होईपर्यंत घोषणा नको अशी भूमिका घेतली आहे. मुंबईतील भांडूप, माहीम, विक्रोळी, शिवडीसह काही मतदारसंघात ठाकरे गट आणि मनसेमध्ये जागांवर तिढा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे.
मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे रखडली असल्याची सूत्रांची माहिती आहे. जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा करू नये, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) घेतली आहे. ठाकरे गटाची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील चर्चेत काही विधानसभा मतदारसंघांमध्ये जागांवर तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघात मनसेला तीन जागा हव्या आहेत, अशी मागणी मनसेने बैठकीत केली आहे. यामध्ये भांडूप, माहीम, विक्रोळी आणि शिवडीसारख्या मतदारसंघांचा समावेश आहे, जिथे जागा वाटपावरून मोठा पेच आहे. नेत्यांकडून हा तिढा सुटत नसल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत अंतिम तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ठाकरे बंधूंनी जास्तीत जास्त एकत्र प्रचारात सहभागी व्हावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं

