Video: 6 बॉलमध्ये 6 सिक्स, 20 बॉलमध्ये 78 धावा, फलंदाजाची झंझावाती खेळी, व्हीडिओ व्हायरल
6 Sixes An Over : एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा कारनामा आतापर्यंत मोजक्याच फलंदाजांनी केला आहे. आता या यादीमध्ये आणखी एका भारतीयाचं नाव जोडलं गेलं आहे. पाहा कोण आहे तो.

क्रिकेट विश्वात आतापर्यंत अनेक असंख्य विक्रम झाले आहेत. दररोज अनेक रेकॉर्ड होतात आणि ते ब्रेकही होतात. क्रिकेट विश्वात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अशक्य वाटणारे रेकॉर्ड सहजरित्या केले जात आहेत. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक, हॅटट्रिक हे आता साधारण झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र अद्याप एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा कारनामा सहजासहजी शक्य नाही. आतापर्यंत युवराज सिंह, हर्षल गिब्स, कायरन पोलार्ड आणि दिग्गजांनी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा बहुमान मिळवला आहे. आता या यादीत आणखी एका फलंदाजाचा समावेश झाला आहे. हा कारनामा करणारा फलंदाज कोण आहे? हे जाणून घेऊयात.
यूरोपियन क्रिकेट एस्टोनिया टी 10 स्पर्धेत भारतीय वंशाच्या डावखुऱ्या फलंदाजाने हा कारनामा केला आहे. साहिल चौहान याने मुळ भारतीय फलंदाजाने टॉलिय युनायटेडसाठी 20 बॉलमध्ये 78 धावांची विस्फोटक खेळी केली. साहिलच्या या खेळीत 11 षटकारांचा समावेश होता. साहिलने या 11 पैकी 6 सिक्स हे एकाच ओव्हरमध्ये फटकावले. साहिलच्या या फटकेबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
साहिलने आठव्या ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकले. साहिल बॅटिंग करत असताना त्याची टीम टॉलिन युनायटेड अडचणीत होती. टॉलिनच्या विजयाची शक्यता फार कमी होती. मात्र साहिलच्या एका ओव्हरमधील 6 सिक्सने गेमच बदलला. साहिलने अरसलान औरंगजेब याच्या बॉलिंगवर सहा सिक्स ठोकले. अरसलानच्या ओव्हरआधी टॉलिन युनायटेड टीमला 18 ओव्हरमध्ये 51 धावांची गरज होती. मात्र साहिलने आठव्या ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकून सामना एकतर्फी केला.
साहिल चौहानचा धमाका, एका ओव्हरमध्ये 6 सिक्स
6️⃣ SIXES IN AN OVER! 🤯
Sahil Chauhan achieves this incredible feat en route his match winning knock of 78.#EuropeanCricket #EuropeanCricketSeries #StrongerTogether pic.twitter.com/P9noiB0nqP
— European Cricket (@EuropeanCricket) May 15, 2024
साहील चौहानची धमाकेदार कामगिरी
दरम्यान साहील चौहान याने यूरोपियन लीग स्पर्धेच्या या हंगामातील 2 डावांमध्ये 18 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने एकूण 143 धावा केल्या आहेत. तसेच 317 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.