कमालच झाली, या देशाने ट्रान्सजेंडर लोकांना ‘मानसिक रुग्ण’ म्हणून जाहीर केले, सरकार करणार मोफत उपचार
एका देशातून वेगळी बातमी आली आहे, जी खूपच धक्कादायक आहे. या देशाने अधिकृतपणे ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी आणि इंटरसेक्स लोकांना 'मानसिक रुग्ण' म्हणून जाहीर केले आहे.
मुंबई : जगात काही तृतीयपंथीय वा ट्रान्सजेंडर लोकांना माणूस म्हणून देखील पाहीले जात नाही. काही देशांनी त्यांच्याशी स्वतंत्र कायदा केला आहे. ट्रान्सजेंडर लोकांसाठी नोकऱ्या किंवा तसेच समलैंगिक विवाह कायदा देखील केला आहे. काही देशात अशा व्यक्तींना समाज दत्तक घेतो. भारतासारख्या देशात या समुहाबद्दल अजूनही गैरसमज आहेत. आता एका देशाने तर ट्रान्सजेंडर लोकांना मानसिक रुग्ण ठरविले आहे.
न्यूयॉर्क पोस्टमधील बातमीत दक्षिण अमेरिकेतील पेरु देशाने ट्रान्सजेंडर लोकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेरु देशाने ट्रान्सजेंडर , नॉन – बायनरी आणि इंटरसेक्स लोकांना मानसिकदृष्ट्या आजारी म्हणून घोषीत केले आहे. त्यांच्यावर आता सरकार मोफत उपचार करणार आहे. मानसिक आरोग्यासाठी वैद्यकीय सेवेचे संपूर्ण कव्हरेज देऊन देशाच्या सार्वजनिक आरोग्य सेवांचा विस्तार केला आहे. याची खात्री करण्यासाठी हा वादग्रस्त निर्णय घेतला आहे.
LGBTQ + आऊटलेट पिंक न्यूजच्या बातमी नुसार आता या निर्णयासाठी आरोग्य विमा योजनेच्या व्याख्येत बदल केली जाणार आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडर आणि इंटरसेक्स लोक मानसिकदृष्ट्या आजारी लोकांना आरोग्यविम्याचे फायदे मिळतील. या नव्या निर्णयानंतर देखील ट्रान्सजेंडर लोकांना तसेच LGBTQ + समुहातील लोकांना कन्व्हर्जन थेरेपी करण्यासाठी मजबूर केले जाणार नाही. परंतू या निर्णयावर पेरु देशातील नागरिकांनी टीका केली आहे. या समुहाच्या अधिकार आणि सुरक्षेच्या लढ्याला मागे घेण्याचा हा निर्णय आहे.
लढाईला अपयश
समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढण्याच्या लढाईला 100 वर्षे झाल्यानंतर पेरु देशाला ट्रान्स लोकांना मानसिक रुग्णांच्या श्रेणीत सामिल करण्याहून चांगल करणे शक्य नव्हते अशी टीका outfestperu चे एडिटर झीन्सर पकाया यांनी केली आहे. हे अत्यंत पुराणमतवादी समाजात घडत आहे, जेथे LGBTQ समुदायाला कोणतेही अधिकार नाहीत आणि जेथे त्यांना मानसिक आजारी जाहीर करून, कन्व्हर्जन थेरपीचे दरवाजे उघडले जात आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही लीमाचे साऊथ सायटीफिक युनिर्व्हसिटीचे वैद्यकीय संशोधक पर्सी मायटा – ट्रिस्टन यांनी टेलिग्राफला सांगितले.