तेलाच्या किमती धाडकन कोसळल्या, अखेर गुड न्यूज आलीच, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात..
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा एकदा धाडकन कोसळलेल्या पाहायला मिळत आहे. आता याचा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरु काय परिणाम झाला आहे की नाही ते पाहा...

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात संभाव्य चर्चा आणि राजनैतिक तोडगा निघण्याच्या वृत्तांनंतर, जागतिक कमोडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील या घसरणीच्या पार्श्वभूमीवर, IOCL, BPCL आणि HPCL यांसारख्या भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. भारतीय तेल कंपन्या 15 दिवसांच्या सरासरी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर दररोज दरांचा आढावा घेतात. सध्या, या कंपन्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून किरकोळ दर स्थिर ठेवले आहेत. आता याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर झाला आहे की नाही ते तपासा…
पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?
जागतिक कच्च्या तेलाच्या किमती नरम पडल्या असूनही, भारतीय तेल कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 111.21 रुपये आणि डिझेलची किंमत 97.83 रुपये प्रति लिटर आहे. मात्र, याच काळात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. यामुळे तेल कंपन्यांकडून दरकपात होईल, अशी जनतेची अपेक्षा वाढली आहे. असे झाल्यास, सामान्य वाहनचालकांना तसेच मालवाहतूक क्षेत्रातील वाहनांचे चालक आणि मालकांना मोठा दिलासा मिळेल.
मध्य पूर्वेत शांततेच्या आशा पुन्हा पल्लवित होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर, अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेबाबतचे अपडेट्स येत आहेत. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत. त्याचवेळी, भारत सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एअर टर्बाइन फ्युएल वरील कर वाढवले आहेत. सोमवारी, सरकारने इंधन निर्यातीवरील विंडफॉल गेन्स टॅक्स वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतला.
सरकारने सोमवारी पेट्रोलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर ₹2.5 वरून ₹3.5 पर्यंत वाढवले असून, हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे. याशिवाय, डिझेल निर्यातीवरील एकूण शुल्क, जे दोन आठवड्यांपूर्वी प्रति लिटर ₹8.5 वरून प्रति लिटर ₹15.5 पर्यंत वाढवण्यात आले होते, ते आता दोन स्वतंत्र करांद्वारे प्रति लिटर ₹25.5 पर्यंत वाढवण्यात आले आहे.