AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पेट्रोलवर 3.5 तर डिझेलवर 24 रूपये प्रति लिटर टॅक्स, केंद्र सरकारची घोषणा

Windfall Tax on Fuel : भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ केली आहे. हा बदल 3 ऑगस्ट म्हणजेच आजपासून लागू झाला आहे.

मोठी बातमी! पेट्रोलवर 3.5 तर डिझेलवर 24 रूपये प्रति लिटर टॅक्स, केंद्र सरकारची घोषणा
Fuel TaxImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 03, 2026 | 9:52 PM
Share

इंधनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ केली आहे. हा बदल 3 ऑगस्ट म्हणजेच आजपासून लागू झाला आहे. आता पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स 2.50 रुपये प्रति लिटरवरून 3.50 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. तर डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स 15.50 रुपये प्रति लिटरवरून 24 रूपये प्रति लिटर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि निर्यातीतून मिळणारा नफा आणि जागतिक बाजारातील सद्यस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तेल कंपन्यांच्या निर्यात नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या कर वाढीचा थेट परिणाम तेल कंपन्यांच्या निर्यात नफ्यावर होऊ शकतो. मात्र, देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर याचा तात्काळ थेट परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण भारतात इंधनाचे दर अनेक घटकांच्या आधारे निश्चित केले जातात. पुढील काळात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि सरकारच्या पुढील आढाव्याकडे बाजाराचे लक्ष असेल.

विंडफॉल टॅक्स म्हणजे काय?

विंडफॉल टॅक्स म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जागतिक बाजारात कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती झपाट्याने वाढतात तेव्हा तेल उत्पादक आणि रिफायनिंग कंपन्यांना अतिरिक्त नफा मिळतो. या अतिरिक्त नफ्यावर सरकार विशेष कर आकारते, त्या कराला विंडफॉल टॅक्स म्हणतात. या कराचा मुख्य उद्देश म्हणजे कंपन्यांच्या नफ्यातील काही हिस्सा सरकारी महसुलात जमा करणे हा आहे.

यापूर्वीही झाले होते बदल

याआधी डिझेलच्या निर्यातीवरील कर 8.50 रूपयांवरून 15.50 रुपये प्रति लिटर करण्यात आला होता. तसेच एटीएफवरील कर 7.50 वरून 14.50 रुपये प्रति लिटर करण्यात आला होता. त्याचवेळी पेट्रोलवरील कर 2.50 प्रति लिटरपर्यंत कमी करण्यात आला होता, जो आता पुन्हा वाढवून 3.50 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.

सर्वसामान्यांवर याचा परिणाम होणार का?

सध्या हा करबदल फक्त निर्यात होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर लागू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, भविष्यात जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि सरकारच्या धोरणांनुसार इंधनाच्या किमतींवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी