110 किमी वेगाने संकट, शाळांना सुट्टी, रेल्वे रद्द, मुरसू चक्रीवादळाचे थैमान, 24 तासात..

रेल्वे गाड्या रद्द, विमानसेवा विस्कळीत, शाळांना सुट्टी पावसामुळे जाहीर करण्यात आली. चक्रीवादळाने थैमान घातल्याचे बघायला मिळत आहे. मध्यरात्री हे चक्रीवादळ धडकल्याने एकच खळबळ उडाली. जोरदार वारे वाहताना दिसत आहे.

110 किमी वेगाने संकट, शाळांना सुट्टी, रेल्वे रद्द, मुरसू चक्रीवादळाचे थैमान, 24 तासात..
Cyclone Michaung
| Updated on: Nov 03, 2026 | 8:17 AM

अर्नब चक्रीवादळानंतर मुरसू चक्रीवादळाचे मोठे संकट आहे. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात धडकले. या वादळामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहत आहेत आणि अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. ओंगोलजवळील कोथापट्टणम बीचवर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. वेगवान वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडत आहे. विजयवाडा परिसरात कालपासूनच मुसळधार पाऊस होता. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुरसू चक्रीवादळाचा मोठा फटका आंध्र प्रदेशात बघायला मिळतोय. बंगालच्या खाडीत या च्रकीवादळाचा दबाव बघायला मिळतोय. इतरही काही राज्यात या चक्रीवादळाचा मोठा इशारा देण्यात आला.

रात्री एक वाजता हे वादळ किनारपट्टी भागात धडकले. आज भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. यादरम्यान 100 ते 110 प्रति तास वेगाने वारे वाहत आहे. पहिले 12 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वारे पुढे सरकले. अर्नब चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर पुन्हा हे वादळ धुमाकूळ घालताना दिसत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिसा राज्यातील नागरिकांना या वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

Loading...

30 हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळतंय. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या. यादरम्यानच शाळा, अंगणवाडी आणि महाविद्यालयांनाही काही भागात सुट्टी जाहीर करण्यात आली. आयएमडी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला.

तेलंगणा राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, ओडिसा, छत्तीसगढच्या काही भागात पाऊस होणार आहे, तसा इशारा देण्यात आला. यादरम्यानच विजयवाडा, तिरूपती, विशाखापट्टनम येथून अनेक विमाने रद्द करण्यात आली. 9 रेल्वेही या वादळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्यात. पुढील दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार असल्याचा अंदाज आहे. प्रशासनाचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. अनेक लोकांना स्थलांतरीत केले जात आहे. अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us