
Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचा लेटेस्ट व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे… या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर लोकांची वर्दळ असताना अचानक ब्लास्ट होतो आणि होत्याचं नव्हतं होतं… तेथे असणाऱ्या लोकांच्या चिंधड्या उडाल्या… आजूबाजूला रिक्षा, कार, दुचाकी उभ्या होत्या पण एका ब्लॉस्टमुळे सर्वकाही नष्ट झाली… सर्वकाही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेलं… सीसीटीव्ही व्हिडीमध्ये दिसत आहे की, ब्लॉस्ट किती भयानक होता..
हा व्हिडिओ स्फोटस्थळाच्या सर्वात जवळचा असल्याचं म्हटलं जात आहे. लाल सिग्नल किंवा वाहतूक कोंडीमुळे वाहने थांबली असल्याचा संशय आहे. ऑटो-रिक्षा आणि काही कार पुढे उभ्या आहेत, तर मागे एक बस दिसत आहे. रस्त्याच्या कडेला काही लोक चालताना दिसतात. काही जण त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत, तर काही एकटे चालत आहेत. अचानक, एक मोठा स्फोट होतो आणि परिसरात धुराचे लोट पसरतात. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील काही क्षणासाठी सर्वकाही धुसर दिसू लागतं. तर काही वेळानंतर लोकं इकडे – तिकडे पळताना दिसत आहेत.
#WATCH | Delhi | CCTV footage of the car blast near the Red Fort that claimed the lives of 8 people and injured many others.
Source: Delhi Police Sources pic.twitter.com/QeX0XK411G
— ANI (@ANI) November 12, 2025
10 नोव्हेंबर संध्याकाळी जवळापास 6.55 वाजता दिल्ली येथील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका I-20 कारमध्ये स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, जागीच 12 जणांचं निधन झालं.. तर काही गंभीर जखमी देखील झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जखमींची विचारपूस केली आहे… या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून दहशतीचं वातवरण निर्माण झालं आहे…
हा आत्मघातकी हल्ला असल्याचे वर्णन डॉ. उमर मोहम्मद यांनी केलं होतं, जे पेशाने डॉक्टर होते आणि फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होते. या स्फोटात 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सध्या पोलीस कसून चौकशी करत असून, महत्त्वाच्या ठिकाणी अर्लट जारी करण्यात आला आहे.