Amarnath : अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या पुण्यातील दोन भाविकांचा मुत्यू ? ढगफुटीमुळे सिंध नदीच्या पाणी पातळीतही वाढ

| Updated on: Jul 09, 2022 | 11:55 AM

अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली आहे.

Amarnath : अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या पुण्यातील दोन भाविकांचा मुत्यू ?  ढगफुटीमुळे सिंध नदीच्या पाणी पातळीतही वाढ
अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या पुण्यातील दोन भाविकांचा मुत्यू ?
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : काश्मीरमधील अमरनाथ (Kashamir Amarnath) येथे मोठी ढगफुटी झाल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. कारण तिथं भावकांची मोठी गर्दी असते. झालेल्या ढगफुटीमध्ये देशातील अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याचं शक्यता व्यक्त केली जात आहे. तिथला परिसर पोलिसांकडून निरिक्षणाखाली असून अनेक भाविकांचे मृतदेह सापडले आहे. विशेष म्हणजे झालेल्या ढगफुटीत महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप तिथल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील अणदूरमधून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले अकरा भाविक सुखरूप असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

तुळजापूर तालुक्यातील अणदूरमधील भाविक सुखरुप

देशात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. देशातील अनेक राज्यात पूरजन्य स्थिती आहे. तसेच काश्मीरमध्ये देखील मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस सुरु आहे. ढगफुटी झाल्यामुळे तिथं मोठा पूर आला आहे. पुरामुळे मदत कार्यात अनेक अडचणी येत असल्याची माहिती तिथल्या पथकाने सांगितली आहे. आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. पण अद्याप तिथल्या प्रशासनाने ही या माहितीला दुजोरा दिलेला नाही. पुरात अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी पथकाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूरमधून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले अकरा भाविक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

एडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल

अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली आहे. संततधार पावसात अचानक ढगफुटीमुळे सिंध नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. ढगफुटीनंतर एडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. पावसाचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी देखील वर्तवला होता.