AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रानंतर दिल्लीत भाजपसाठी Good News, पहिल्या सर्व्हेतून काय मिळाले संकेत

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक निकाल येणार आहेत. निवडणुकीसाठी प्रचार रंगात आला आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये नाही तर भाजप आणि आम आदमी पक्षात आहे.

महाराष्ट्रानंतर दिल्लीत भाजपसाठी Good News, पहिल्या सर्व्हेतून काय मिळाले संकेत
delhi election 2025
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 12, 2025 | 7:07 PM
Share

Delhi Assembly Election 2025: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जोरदार कामगिरी करणाऱ्या भारतीय जनता पक्षासाठी चांगली बातमी आली आहे. दिल्ली विधानसभेसाठी 27 वर्षांपासून सुरु असलेला भाजपचा राजकीय वनवास संपण्याची चिन्हे दिसत आहे. या निवडणुकीत दिल्लीकर भाजपला संधी देणार असल्याचा सर्व्हे आला आहे. त्यामुळे ‘आप’ची चिंता वाढली आहे. या सर्व्हेतून भाजप सत्ता स्थापन करण्याचा जवळ पोहचत आहे.

काय आहे सर्व्हेतील संकेत

‘टाइम्स नाऊ जेवीसी’चा ओपिनियन पोल आला आहे. या पोलमध्ये ‘आप’ आणि भाजपमध्ये ‘कांटे की टक्कर’ दिसत आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत 70 मधून 67 आणि 62 जागा जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला जबरदस्त फटका बसताना दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने 7 टक्के मते घेतली तर भाजपचा विजय निश्चित दिसत आहे. सर्व्हेमधून भाजप आणि ‘आप’ यांच्यात सत्तेसाठी संघर्ष दिसत आहे. ‘आप’ला 33-37 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 33 ते 36 जागा मिळण्याचे संकेत सर्व्हेमधून समोर आले आहे. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावा लागणार आहे.

काँग्रेस करणार ‘आप’चा घोळ

काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ‘रेवाडी कार्ड’ बाहेर काढला आहे. काँग्रेसने जनतेमध्ये ‘रेवाडी कार्ड’चा जोरदार प्रचार केला तर ‘आप’ला 44.74 टक्के मते मिळतील आणि भाजप 46.16 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला 7.5 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आम आदमी पक्ष बहुमताच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला 27 ते 33 जागा मिळू शकतात. त्याच वेळी, भाजप 37-41 जागा जिंकून सरकार स्थापन करता येईल. काँग्रेस अजूनही 0-2 जागांवर राहू शकतो.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक निकाल येणार आहेत. निवडणुकीसाठी प्रचार रंगात आला आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये नाही तर भाजप आणि आम आदमी पक्षात आहे.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर