दिल्लीची घटना दहशतवादी हल्ला की फक्त स्फोट? केंद्र सरकारने थेट सांगितलं, आता तपासाचे चक्र फिरणार!

Delhi Blast Update: दिल्लीतील बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक बोलावली होती. यात सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.

दिल्लीची घटना दहशतवादी हल्ला की फक्त स्फोट? केंद्र सरकारने थेट सांगितलं, आता तपासाचे चक्र फिरणार!
PM Modi in CSE Meeting
| Updated on: Nov 12, 2025 | 9:15 PM

दिल्लीतील बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्रिमंडळाने या बॉम्बस्फोटांचा निषेध करणारा आणि जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव मंजूर केला. त्याच बरोबर सरकारने या घटनेचे वर्णन एक दहशतवादी हल्ला असंही केलं आहे. तसेच या घटनेचा त्वरित तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हा दहशतवादी हल्ला, तात्काळ चौकशी होणार

मंत्रिमंडळाच्या या बैठकीत दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीवर आणि सुरक्षा संस्थांच्या अहवालांवर चर्चा झाली. यानंतर सरकारने म्हटले की, ’10 नोव्हेंबर रोजी देशविरोधी शक्तींनी केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा देश साक्षीदार आहे. मंत्रिमंडळाने या घटनेची अत्यंत तातडीने आणि व्यावसायिकतेने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गुन्हेगार, साथीदार आणि त्यांच्या मागे असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना शिक्षा दिली जाणार आहे.’

महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा

मंत्रिमंडळाच्या या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल उपस्थित होते. मंत्रिमंडळ समितीच्या या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. ही बैठक सुमारे अर्धातास चालली. या बैठकीत देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

पंतप्रधानांनी घेतली जखमींची भेट

भूतान दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जात जखमींसोबत संवाद साधला. या भेटीत पंतप्रधानांनी गुन्हेगारांना शिक्षा मिळेल असं विधान केले. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करताना पंतप्रधानांनी लिहिले की, “दिल्ली बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना भेटण्यासाठी मी रुग्णालयात गेलो होतो. मी सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. या कटामागे जो कोणी असेल त्याला शिक्षा मिळेल.”

इंटरनॅशनल कनेक्शन

दिल्लीतील या बॉम्बस्फोटचं इंटरनॅशनल कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. या बॉम्बस्फोटांचा संबंध आता तुर्कीशी असल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. डॉ. मोहम्मद उमर आणि डॉ. मुझम्मिल शकील यांच्या पासपोर्टमध्ये ते तुर्कीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कीत हे दोघे नेमके कुणाला भेटले याचा सखोल तपास सुरु आहे.