डेंजर झोनमध्ये दिल्ली! राजधानी आणि परिसरात घोंघावतोय 7.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धोका

राजधानी दिल्लीवर मोठ्या भूकंपाचा धोका घोंघावत आहे. नेपाळ, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये आलेल्या भूकंपानंतर हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

डेंजर झोनमध्ये दिल्ली! राजधानी आणि परिसरात घोंघावतोय 7.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धोका
दिल्लीत भूकंपाचा धोका Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 9:14 AM

नवी दिल्ली, नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या 5.4 तीव्रतेच्या भूकंपाचे (Earthquake Delhi)  धक्के दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) ते उत्तराखंडपर्यंत जाणवले. हा भूकंप उत्तराखंडमधील पिथौरागढच्या पूर्व-दक्षिणपूर्व 101 किमी अंतरावर झाला. आठवडाभरापूर्वीही दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचवेळी पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने पुढील धोक्याची भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, ही भीतीही रास्त आहे कारण नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा आसपासच्या भागात जेव्हा जेव्हा भूकंप होतो तेव्हा त्याचा परिणाम दिल्लीतही दिसून येतो. आतापर्यंत भूकंपाचे धक्के धोकादायक नव्हते, परंतु माध्यमांच्या मते, सरकारच्या एका अहवालात असे सांगण्यात आले आहे की, दिल्लीवर मोठ्या भूकंपाचा धोका आहे.

मोठ्या भूकंपाचा धोका

मीडिया रिपोर्ट्सनुसार राजधानी दिल्लीत केव्हाही 7 ते 7.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. त्याच वेळी, या तीव्रतेच्या भूकंपामुळे राजधानीत मोठा विध्वंस होऊ शकतो.  2015 मध्ये नेपाळमध्ये ज्या भूकंपाने हाहाकार माजवला होता, त्याची तीव्रता 7.8 एवढी होती. आता या धोक्याचा सामना करण्यास दिल्ली तयार आहे का, हा प्रश्न आहे?

इमारती करू शकणार नाहीत हादरे सहन

एका अहवालानुसार, दिल्लीत सहा रिश्टर स्केलपेक्षा जास्त भूकंप झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील निम्म्याहून अधिक इमारती हा धक्का सहन करू शकणार नाहीत. त्याचबरोबर दाट लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा धोका माहिती असतानाही  दिल्लीत ते टाळण्यासाठी ना उपाय योजले गेले ना इमारती बांधताना काळजी घेतली गेली.

हे सुद्धा वाचा

नेपाळमध्ये एका आठवड्यात तीन भूकंप

नेपाळच्या नॅशनल भूकंप मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरच्या मते, शनिवारी झालेल्या भूकंपाचे केंद्र 29.28 अंश उत्तर अक्षांश आणि 81.20 अंश पूर्व रेखांशावर बझांग जिल्ह्यातील पाताडेबल येथे 10 किमी खोलीवर होते. नेपाळमध्‍ये आठवडाभरातील हा तिसरा भूकंप आहे, मात्र यामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. काठमांडूपासून 460 किमी पश्चिमेला असलेल्या बझांग जिल्ह्यात संध्याकाळी 7.57 वाजता भूकंप आला, त्यामुळे लोकं घाबरून घराबाहेर पडले.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजनौर, मुझफ्फरनगर आणि शामलीसह इतर जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नोएडामध्ये सुमारे 10 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.  हे धक्के बुधवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याइतके तीव्र नव्हते, परंतु त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

8 ते 12 नोव्हेंबर दरम्यान किमान आठ भूकंप

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या आकडेवारीनुसार, 8 ते 12 नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंड-नेपाळ सीमेला लागून असलेल्या हिमालयीन प्रदेशात वेगवेगळ्या तीव्रतेचे किमान आठ भूकंप झाले आहेत. पिथौरागढचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बीएस महार यांनी सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या सिलांग शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर होता, मात्र त्याचे धक्के भारत, चीन आणि नेपाळमध्ये जाणवले.

Non Stop LIVE Update
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.