Marathi News National Delhi Police chief Rakesh Asthana formed secretariat and appoint new officers
Photos: राकेश अस्थानाकडून दिल्ली पोलीस आयुक्तालयात मोठे बदल, ‘या’ नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Rakesh Asthana) यांनी पोलीस मुख्यालयात आयुक्त सचिवालय बनवलं आहे. विशेष म्हणजे आयुक्त सचिवालयात 2 अतिरिक्त पोलीस आयुक्तांसोबत एका एसीपी रँकच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची ही पहिली वेळ आहे.
दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Rakesh Asthana) यांनी पोलीस मुख्यालयात आयुक्त सचिवालय बनवलं आहे. विशेष म्हणजे आयुक्त सचिवालयात 2 अतिरिक्त पोलीस आयुक्तांसोबत एका एसीपी रँकच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची ही पहिली वेळ आहे.
के. पी. एस. मल्होत्रा (KPS Malhotra) डीसीपी 1 म्हणून आयुक्त सचिवालयात नियुक्त झालेत. केपीएस मल्होत्रा यांनीच NCB मध्ये डेप्युटी डायरेक्टर पदावर असताना दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर पासून सुशांत सिंह राजपूत ड्रग्स कनेक्शन प्रकरणात चौकशी केली होती.
ढाल सिंह पतले (Dhal Singh Patle) यांची कमिश्नर सचिवालयात डीसीपी 2 म्हणून नियुक्ती झालीय. ढाल सिंह ते अधिकारी आहेत ज्यांनी जामिया हिंसा आणि शाहीन बाग प्रदर्शनाचा तपास केला होता.
2007 बॅचचे आयपीएस रोमिल बनिया (Romil Baniya) यांची आयुक्तांचे OSD आणि अॅडिशनल सीपी सचिवालय म्हणून नेमणूक करण्यात आलीय. बनिया आधी अरुणाचलमध्ये तैनात होते.
तनु शर्मा (Tanu Sharma) यांना कमिश्नर सचिवालयात एसीपी पदावर नियुक्त करण्यात आलंय. तनु शर्मा आधी नागरी सेवेशी संबंधित होत्या. सेक्रेटरी रिट्रीट म्हणून होणाऱ्या नियुक्त्या सामान्यपणे रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) आणि निमलष्करी दलात दिसतात. आता दिल्ली पोलीस कमिश्नर राकेश अस्थाना यांच्या आदेशाने दिल्लीतही तशा नियुक्त्या होत आहेत.