Delhi terror plot : सर्वात मोठी बातमी, राजधानी दिल्लीत घडणार होतं अघटीत; दहशतवादी कट उधळला, चौघांना अटक

दिल्ली पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उधळला आहे. ISI शी संबंधित चौघांना अटक करण्यात आली असून, यात पंजाबमधून तिघे आणि दिल्लीतून एकाचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली.

Delhi terror plot : सर्वात मोठी बातमी,  राजधानी दिल्लीत घडणार होतं अघटीत; दहशतवादी कट उधळला, चौघांना अटक
राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळला
| Updated on: Jul 02, 2026 | 3:48 PM

राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी आली आहे. दिल्लीत दहशतवादी कट उधळला असून ISI शी संबंधित चौघांना अटक झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही मोठी कारवाई केली असून पंडाबमधून तिघांना तर दिल्लीतून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.शहजाद भट्टी याच्या सूचनेवरून आरोपी हल्ल्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही खूप मोठी कारवाई केली आहे. राजधानी  दिल्ली किंवा दिल्ली एनसीआरस असेल, या परिसरामध्ये मोठा दहशतवादी कट करण्याचा प्रयत्न या सगळ्यांकडून केला जात होता. पण दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या कारवाईमुळे हा कट उधळून लावण्यात यश आलं. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेले हे सर्व आरोपी, तिशीच्या आतले होते.  ISI चा हँडलर शेहजाद भट्टी याच्या सूचनेवरून हे आरोपी सर्व कारवाया करत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यावेळी आरोपींना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडून पिस्तुल, रायफल या शस्त्रांसह काही काडतुसं देखील जप्त करण्यात आलेली आहे.  एक मोठा दहशतवादी कट उधळून लावण्यात स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांना यश मिळालं आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून कोणती कोणती मोठी माहिती समोर येतात आणि पाकिस्तानच्या हँडलरसोबत आणखी काही संबंध आहेत का, याबद्दल काही माहिती समोर येते ते पाहणे महत्वाचं ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us