मंद्यधुंद व्यक्तीची विमानात लघुशंका, एअर इंडियाला ३० लाखांचा दंड

| Updated on: Jan 20, 2023 | 3:26 PM

लघुशंका प्रकरणात एअर इंडियाला ३० लाखांचा दंड व पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. पायलटवर कारवाई विमान वाहतूक नियम १९३७ च्या कलम १४१ नुसार करण्यात आली आहे.

मंद्यधुंद व्यक्तीची विमानात लघुशंका, एअर इंडियाला ३० लाखांचा दंड
air india
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली : हवाई वाहतूक संचालनालय (DGCA)एअर इंडियावर मोठी कारवाई केली आहे. एअर इंडियाच्या विमानात नागरी विमान वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात एअर इंडियाला ३० लाखांचा दंड व पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. पायलटवर कारवाई विमान वाहतूक नियम १९३७ च्या कलम १४१ नुसार करण्यात आली आहे. आपले कर्तव्य बजावण्यात पायलट अयशस्वी राहिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच विमानाच्या संचालकांना तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

 

हे सुद्धा वाचा

अमेरिकेहून नवी दिल्लीला येणाऱ्या एका विमानात एका ७० वर्षीय महिला प्रवाशीवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघुशंका केली. त्या महिलेने या संदर्भात केबिन क्रू कडे तक्रार केली. त्यानंतर देखील त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. महिलेने एअर एंडियावर समझोता करण्याचा आरोप लावला. यामुळे त्या महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. त्या पत्रात म्हटले आहे की, मी एअर इंडियाच्या फ्लाईट AI102 ने २६ नोव्हेंबर रोजी प्रवास करीत होती. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेला प्रवासी माझ्यासमोर आला. त्याने माझ्यासमोर लघुशंका केली. या प्रकारामुळे माझे कपडे आणि इतर वस्तू खराब झाल्या. क्रू मेंबर्स या घटनेप्रती गंभीर नव्हते.

दिल्ली पोलिसांत गुन्हा

एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघवी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. घटनेच्या ४२ दिवसांनंतर त्याला अटक होऊ शकते. मुंबईचा रहिवासी असलेला शंकर फरार होता. त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे अटक केली.पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि 354,294,509,510 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.त्यानंतर या प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

एअर इंडियाची बंदी

एअर इंडियाने शंकर मिश्राला प्रवाशासाठी चार महिन्याची बंदी घातली होती. शंकर मिश्रा वुल्फ फार्गोमध्ये नोकरीला होता. त्या कंपनीने त्याला नोकरीवरुन काढून टाकलं. शंकर यांच्यावर झालेला आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.