Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा..

Train Ticket Booking: भारतीय रेल्वेने RailOne एपने अनारक्षित टिकीट बुक केल्यानंतर मिळणारी सवलत आता पुढच्या वर्षीपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे आता प्रवाशांची तिकीटांच्या रांगापासून सुटका मिळणार आहे.

Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा..
indian railway news
| Updated on: Jul 16, 2026 | 10:09 PM

General Ticket Booking : जर तुम्ही नेहमी जनरल तिकीट काढून रेल्वेचा प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. भारतीय रेल्वेने एक्सवर एक पोस्ट करुन सांगितले आहे की RailOne App अंतर्गत अनारक्षित ( Unreserved ) तिकीट बुकींग करणाऱ्या प्रवाशांना मिळणारे डिस्काऊंट आता पुढील वर्षापर्यंत वाढवले आहे. याचा सर्वात मोठा लाभ हा आहे की तुम्ही घरबसल्या तिकीटांची बुकींग करु शकता आणि तिकीटांच्या रांगापासून वाचू शकता.

रेल्वेच्या या मोहिमेचा उद्देश्य अधिकाधिक प्रवाशांना डिजिटल तिकीटींगला जोडणे हा आहे. पेपर लेस तिकीटांमुळे वेळ, पर्यावरण याची देखील बचत होत असते. जर तुम्ही जनरल तिकीटांना बुक करु इच्छित असाल तर रेल वन एपचा तु्म्हाला फायदेशीर ठरु शकते.

ऑनलाईन तिकीट बुकिंगवर डिस्काऊंट

RailOne App ने अनारक्षित तिकीट बुक केल्यानंतर भाड्यात ३ टक्के सूट मिळते.

UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकींग सारख्या डिजिटल पेमेंट केल्यानंतर डिस्काऊंट मिळते.

सुट थेट तिकीट बुक करतानाच लागू होणार आहे.

लांब रांगांपासून सुटका

जनरल तिकीटांसाठी तुम्हाला आता स्थानकाच्या तिकीट खिडक्यांवर रांगा लावण्याची काहीही गरज राहणार नाही. तुम्ही घरबसल्या तिकीटांची मोबाईल वा कॉम्प्युटर द्वारे बुकींग करु शकता. त्यामुळे वेळेची मोठी बचत होईल आणि तिकीट खरेदी करणे एकदम सोपे होईल.

केव्हा मिळणार ऑफर ?

जर तुम्ही RailOne App ने तिकीट बुक करत असाल तर ते तिकीट संपूर्ण डिजिटल होईल, या तिकीटांची प्रिंट काढण्याची कोणतीही गरज राहणार नाही.प्रवासात तुम्ही टीटीईला मोबाईलवर काढलेले तिकीट दाखवू शकता.

रेल्वेने या पद्धतीने तिकीट काढल्यास ३ टक्के सुट जारी केली होती. तिची मुदत आता ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढविली आहे. तर तुम्ही नेहमी जनरल तिकीटावर प्रवास करत असाल तर तुम्ही रेलवन अॅप्सद्वारे ऑनलाईन तिकीट बुक करु शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे दोन्हींची बचत करु शकणार आहे.

Follow Us