भारत इस्त्रायलला कर्ज देतो का? किती आहे भारताचं इस्त्रायलवर कर्ज?

इस्त्रायल हे भारताचं मित्र राष्ट्र आहे. दोन्ही देश एकमेकांचे प्रमुख आर्थिक भागिदार देश आहेत. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की भारत इस्त्रायलला नेमकं किती कर्ज देतो?

भारत इस्त्रायलला कर्ज देतो का? किती आहे भारताचं इस्त्रायलवर कर्ज?
Binyamin Netanyahu, Narendra Modi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 6:46 PM

इस्त्रायल हा भारताचा मित्र देश आहे. इस्त्रायल आणि भारताची मैत्री ही केवळ कुटनीती स्थरावरच मर्यादित नाहीये, तर तिचं रूपांतर आता एका मोठ्या आर्थिक भागीदारीमध्ये झाल्याचं देखील पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचा दौरा केला होता. इस्त्रायलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं. इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दरम्यान भारत कोणाला कोणाला कर्ज देतो? आर्थिक मदत करतो? असा प्रश्न येतो तेव्हा सर्वात आधी भारताच्या शेजारील देशांची नावं पुढे येतात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? भारत इस्त्रायलला कर्ज देतो का? आणि देत असेल तर भारताचं इस्त्रायलवर किती कर्ज आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

भारत इस्त्रायलला कर्ज देतो का?

सामान्यपणे भारत हा आपल्या शेजारचे देश जसं की श्रीलंका, नेपाळ या सारख्या गरीब देशांना कर्ज देतो. भारताचं सर्वसामान्यपणे असं धोरण आहे की, जे अविकसीत देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत, त्यांना कर्ज दिलं जातं. परंतु इस्त्रायलसंदर्भात भारताचं धोरण हे थोडं वेगळे आहे, कारण इस्त्रायल हा विकसीत अर्थव्यवस्था असलेल्या (OECD) सदस्य आहे. त्यामुळे इस्त्रायलला भारताच्या कर्जाची गरज पडत नाही. त्यामुळे भारत देखील इस्त्रालयला कर्ज देत नाही.

मात्र दोन्ही देशांमध्ये आर्थिक संबंध हे मजबूत आहेत. भारत इस्त्रायलला थेट कर्ज देत नाही. मात्र भारतीय कंपन्यांनी इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. 2000 पासून ते 2025 पर्यंत भारतीय कंपन्यांनी इस्त्रालयमध्ये तब्बल 443 मिलियन डॉलरची थेट गुंतवणूक केली आहे. भारताच्या अदानी ग्रुपची इस्त्रायलमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे. एका रिपोर्टनुसार अदानी ग्रुपने इस्त्रायलचं फाइफा पोर्ट खरेदी करण्यासाठी तब्बल 1.18 बिलियन डॉलर जवळपास 9800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2023 मधील ही इस्त्रायलमधली सर्वात मोठी गुंतवणूक मानली जाते. मात्र सध्या इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असल्यानं तेथील वातावरण अस्थिर बनलं आहे.

 

Follow Us