भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल मिळताच डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले, थेट निर्बंध लादले, तडकाफडकी घोषणेनं मोठी खळबळ

शांततेच्या नोबेलसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दावा करण्यात आला होता. परंतु नोबेलने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना हुलकावणी दिली आहे. त्यानंतर प्रचंड संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट मोठी घोषणा केली आहे.

भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल मिळताच डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले, थेट निर्बंध लादले, तडकाफडकी घोषणेनं मोठी खळबळ
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 6:07 PM

आपल्यालाही शांततेसाठी मिळणारा नोबेल पुरस्कार मिळावा अशी इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. मात्र यावेळी देखील त्यांना नोबेलने हुलकावणी दिली आहे. शांततेच्या नोबेलसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दावा करण्यात आला होता. आपण आठ युद्ध थांबवले असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र यावेळी देखील त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकलेला नाहीये. नोबेल समितीने ट्रम्प यांना मोठा झटका दिला. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) च्या माजी जज नवी पिल्लई यांना मिळाला आहे. त्या मुळ भारतीय वंशाच्या आहेत. दरम्यान नोबोल समितीने शांततेचा पुरस्कार नवी पिल्लई यांना जाहीर करताच डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. ते प्रचंड संतापले आहेत.

मुळ भारतीय वंशाच्या असलेल्या नवी पिल्लई यांना नोबेल पुरस्कार मिळताच अवघ्या काही तासांमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे, त्यांनी थेट आता इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टावरच निर्बंध घातले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. हे कायद्याचं उल्लंघन आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट स्वातंत्र्य नाही, ज्या देशांनी एकत्र येऊन याची स्थापना केली, त्यामध्ये त्यांचं देखील हीत आहे, असं यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे. जर न्यायालयाने आपल्या मर्यादा ओलांडल्या तर त्यांना भयंकर परिणामाला सामोरे जावे लागेल अशी उघड उघड धमकी देखील ट्रम्प यांनी दिली आहे.

Loading...

दरम्यान दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे नॉर्वेवर देखील चांगलेच भडकले आहेत. नोबेल समितीचा हा निर्णय लाज वाटावा असा आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे नॉर्वेची प्रतिमा डागाळली आहे. हा डाग आता लवकर दूर होणार नाही. आम्ही नॉर्वेच्या या निर्णयाला कधीच विसरणार नाही. एका अशा व्यक्तीला नोबेल पुरस्कार देण्यात आला, जीचं नाव मी या आधी कधी ऐकलं नव्हतं. मी आठ युद्ध थांबवली असं देखील यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us