मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, 24 तासात घेणार सर्वात मोठा निर्णय!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा धक्का दिला आहे. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी, पुढील 24 तासांत भारतावरील कर मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, 24 तासात घेणार सर्वात मोठा निर्णय!
donald trump
| Updated on: Aug 05, 2025 | 7:05 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा धक्का दिला आहे. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी, पुढील 24 तासांत भारतावरील कर मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले होते की, भारत मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत आहे आणि ते विकून नफा देखील कमवत आहे. भारत रशियासोबत व्यापार करत असल्याने ट्रम्प यांनी ही कर वाढवण्याची घोषणा केली आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे म्हटले होते की, ‘भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो आणि ते विकून नफा कमवतो. यामुळे रशियालाही फायदा होत आहे. रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये लोक मारले जात आहेत याची भारताला पर्वा नाही. त्यामुळे मी भारतावर कर वाढवणार आहे.’ याचा मोठा फटका भारतातून अमेरिकेला केल्या जाणाऱ्या निर्यातीवर होणार आहे.

भारताने ट्रम्पच्या धमकीला उत्तर दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, ‘अमेरिका अजूनही रशियाकडून आपल्या अणु उद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी पॅलेडियम, खते आणि रसायने आयात करते. मात्र भारत रशियासोबत व्यापार करत असल्याने अमेरिकेला ते सहन होत नाही.

आधी लावला होता 25 टक्के कर

या आधी अमेरिकेने 29 जुलै रोजी भारतावर 25 टक्के कर लावल्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध तितकेसे चांगले नाहीत असंही विधान केलं होतं. अनेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. आता आणखी कर वाढणार असल्याने भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे.

भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार

भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करतो. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, अनेक युरोपीय देशांनी रशियासोबतच्या व्यापारावर बहिष्कार टाकला होता. अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियन तेलावर बंदी घातली होती, मात्र भारत आणि चीन सारख्या आशियाई देशांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले होते. भारत अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे.