मोठी बातमी! अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनं मोठी खळबळ, आता तब्बल एवढा टॅरिफ

मोठी बातमी समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा टॅरिफची घोषणा करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यापासून 25 टक्के टॅरिफ आकारला जाईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनं मोठी खळबळ, आता तब्बल एवढा टॅरिफ
donald trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 03, 2026 | 7:27 PM

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. एकीकडे इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता, तो अजूनही बंदच आहे. त्यात भरीसभर म्हणजे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे मध्य पूर्वेतून येणारं कच्च तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा टॅरिफच्या घोषणेनं जगभरात खळबळ उडून दिली आहे.

जर्मनीविरोधात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर्मनीमधून आपलं सैन्य माघारी बोलवण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की जर्मनीमध्ये अमेरिकेचे केवळ 5 हजार सैन्यच राहील. मात्र आता त्यांनी आपला निर्णय बदलला आहे. जर्मनीमध्ये आता पाच हजारांपेक्षाही कमी सैन्य अमेरिका ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली आहे. त्यांनी युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या देशांमध्ये निर्माण होणाऱ्या कार आणि ट्रक यांच्यावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावला आहे. याचा सर्वाधिक फटका हा जर्मनीला बसणार आहे. कारण जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात कार आणि वाहनांची निर्मिती होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, युरोपियन युनियनने व्यापारी करारांच्या अटीचं पालन केलं नाही. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यापासून युरोपियन युनियनचे जे सदस्य देश आहेत, त्या देशांमध्ये तयार होणाऱ्या कार आणि ट्रकवर 25 टक्के टॅरिफ आकारला जाईल. ते फ्लोरिडामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दरम्यान आता हा अमेरिकेचा जर्मनीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

Follow Us