मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं इराणसमोर सरेंडर; अमेरिकेनं गुडघे टेकवले? मध्यपूर्वेत मोठी उलथापालथ
मोठी बातमी समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर शरणागती पत्कारली आहे. अमेरिकेनं घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढच्या 48 तासांमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर 40 व्या दिवशी तीनही देशांमध्ये युद्धविराम झाला. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबलेला नाहीये. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता. त्यानंतर या मार्गावर अमेरिकेनं देखील नाकेबंदी केली. दरम्यान कच्चे तेल आणि एलपीजी वाहातुकीसाठी जगातीत हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगाची मोठी कोंडी झाली आहे. जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला धमक्या दिल्या जात आहेत. 28 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, की आम्ही आता लवकरच इराणमधील सत्ता उलथून टाकू, तर 7 मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देताना असं देखील म्हटलं होती की, कोणतीही अट न ठेवता इराणने आत्मसमर्पण करावं, आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग राहिलेला नाहीये. तसेच त्यांनी आपल्या एका पोस्टमध्ये इराण हे युद्ध हरल्याचा दावा देखील केला होता.
मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेनं बुधवारी पुन्हा एकदा इराणसमोर युद्धविरामासाठी नवा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठं-मोठे दावे करण्यात येत आहेत. आम्ही इराणला गुडघे टेकवण्यास भाग पाडलं असं ते म्हणत आहेत. मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा इराणसोबत नव्याने डील करण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं इराणला नवा प्रस्ताव पाठवला आहे. ज्यामध्ये इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू करावं आणि हे युद्ध थाबवावं अशा दोन अटी आहेत. दरम्यान अमेरिकेच्या या प्रस्तावाची आता जगभरात चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांनी सरेंडर केलं का? असा सवालही उपस्थित होत आहे.
इराणला 48 तासांचा वेळ
दरम्यान अमेरिकेकडून इराणला आता आपल्या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी 48 तासांचा वेळ देण्यात आला आहे. मात्र इराण अमेरिकेचा हा प्रस्ताव मान्य करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर इराणने अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला तर पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू होण्याची शक्यता आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू होऊन, इंधन पुरवठा कधी सुरळीत होणार याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.