सर्वात मोठी बातमी, मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा संशय, हाय लेव्हलच्या यंत्रणा कामाला

| Updated on: Jan 09, 2023 | 11:28 PM

मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या विमानाचं गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं आहे. विमानात बॉम्ब असल्याच्या संशयामुळे जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं आहे.

सर्वात मोठी बातमी, मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा संशय, हाय लेव्हलच्या यंत्रणा कामाला
Follow us on

गांधीनगर : गुजरातमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येतेय. मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या विमानाचं गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं आहे. विमानात बॉम्ब असल्याच्या संशयामुळे जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं आहे. बॉम्ब शोधक पथक तातडीने जामनगर विमानतळावर दाखल झालंय. विमानतळावर अतिशय वेगाने घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या विमानात 244 प्रवाशी होते. सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. विमानातून प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं असून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपास सुरु आहे.

संबंधित विमान हे रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को येथून गोव्यासाठी रवाना झालं होतं. या दरम्यान फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर तातडीने जामनगर विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं.

या फ्लाईटला आयसोलेटेड रनवेवर उतरवण्यात आलं. फ्लाईटच्या लँडींग नंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आता पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि नाशक पथकाकडून तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसला मॉस्कोतून गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती देणारा फोन आला होता. त्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या.

एटीएसने तातडीने विमानाच्या लोकेशनचा विचार करुन जवळ असणाऱ्या विमानतळावर लँडींग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जामनगर विमानळावर सुरक्षित लँडींग करण्यात आलं.

सुरक्षा यंत्रणांकडून सध्या तपास सुरु आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विमानाचं लँडींग करण्यात आलंय. या तपासातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.