अँटीइन्कम्बन्सी फटका तर इंदिरा गांधींनाही बसला, मग मोदी, शाहांच्या बाबतीत हे का घडत नाही? पत्रकार परिषदेत राहुल गांधींचे गंभीर आरोप

एसआयआर प्रक्रिया आणि मतदार याद्यांवरून सध्या चांगलाच वाद सुरू आहे. एसआयआर प्रक्रियेवरून सुरुवातीपासूनच विरोधाकांकडून सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

अँटीइन्कम्बन्सी फटका तर इंदिरा गांधींनाही बसला, मग मोदी, शाहांच्या बाबतीत हे का घडत नाही? पत्रकार परिषदेत राहुल गांधींचे गंभीर आरोप
Rahul Gandhi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 6:13 PM

एसआयआर प्रक्रिया आणि मतदार याद्यांवरून सध्या चांगलाच वाद सुरू आहे. एसआयआर प्रक्रियेवरून सुरुवातीपासूनच विरोधाकांकडून सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मतदानाची चोरी होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान त्यानंतर आता SIR प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरून दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मी एका राजकारणी कुटुंबातून येतो. मी माझ्या आयुष्याचे 50 वर्ष एका राजकारणी कुटुंबासोबत घालवले आहेत. प्रस्थापित सरकारविरोधी लाट हे भारतीय लोकशाहीचं मोठं वैशिष्ट्य राहिलं आहे. ती भारतामधील सर्वात मोठी मूलभूत ताकद राहिली आहे. प्रस्थापित सरकारविरोधी लाट ही कोणत्याही सरकारविरोधात अतिशय वेगाने जनमत तयार करू शकते. याच्या तडाख्यामधून कोणतंही सरकार वाचू शकलेलं नाहीये, असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं देखील उदारहण दिलं. इंदिरा गांधी यांनी बांगलादेशचं युद्ध जिंकलं होतं. त्यावेळी त्या प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या एक ते दोन वर्षांतच त्यांना प्रस्थापित सरकारविरोधी लाटीचा सामना करावा लागला होता. भारतातील अनेक नेत्यांसोबत असं घडतं. काँग्रेससोबत देखील अनेकदा असं घडलं आहे. मग मला हे कळत नाहीये, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत हे का घडत नाहीये. त्यांना का अँटीइन्कम्बन्सी फटका बसत नाहीये? ज्ञानेश कुमार हे स्वतंत्रपणे काम करत नाहीयेत, त्यांना नियंत्रित केलं जात आहे. मोदी, शाह हे त्यांना नियंत्रित करत आहेत, आमच्याकडे व्होट चोरीचे सर्व पुरावे आहेत. अमित शाह यांनीच ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली आहे, असा आरोप या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us