आयटी इंडस्ट्रीचे पितामह, टीसीएसचे पहिले सीईओ फकीर चंद कोहली यांचं निधन

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) पहिले सीईओ आणि भारतात आयटी क्रांती घडवून आणणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व फकीर चंद कोहली यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते 96 वर्षाचे होते. (Faqir Chand Kohli, father of India's software industry, passes away)

आयटी इंडस्ट्रीचे पितामह, टीसीएसचे पहिले सीईओ फकीर चंद कोहली यांचं निधन
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 7:44 PM

नवी दिल्ली: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) पहिले सीईओ आणि भारतात आयटी क्रांती घडवून आणणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व फकीर चंद कोहली यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते 96 वर्षाचे होते. त्यांना भारतातील आयटी इंडस्ट्रीचे पितामह म्हणून ओळखले जाते. (Faqir Chand Kohli, father of India’s software industry, passes away)

फकीर चंद कोहली यांचा जन्म आताच्या पाकिस्तानमधील पेशावरमध्ये झाला होता. त्यांनी पंजाब विद्यापीठातून भौतिक शास्त्रात पदवी घेतली होती. 1946मध्ये ते कॅनडाला गेले होते. तिथे त्यांनी किंग्स्टन, ओन्टारिओमध्ये क्वीन्स विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर 1951मध्ये त्यांनी अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.

त्यानंतर 1951मध्ये कोहली हे टाटा इलेक्ट्रिकमध्ये रुजू होण्यासाठी भारतात परतले. 1969 मध्ये टाटा समूहाने त्यांना आयटी सेवांमध्ये सुधार करण्यास सांगितला. कोहली यांच्या प्रयत्नातूनच टीसीएसचा जन्म झाला आणि टीसीएस नावारुपालाही आली.

कोहली यांच्या निधनावर दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. कोहली केवळ टीसीएसचे सीईओ नव्हते तर भारताच्या विकास गाथेची पायाभरणी करणारे महान व्यक्ती होते, अशा शब्दांत महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. दूरदर्शी आणि भारतीय सॉफ्टवेअरच्या या जनकाचे त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी कायम स्मरण केलं जाईल, अशी प्रतिक्रिया नेसकॉमने व्यक्त केली आहे.

5 एफ वर्ल्डचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक गणेश नटराजन यांनीही फकीर चंद कोहली यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. एफसी कोहली यांचं जाणं ही दुखद घटना आहे. त्यांनी अनेक दशके टेक्नॉलॉजीच्या दुनियेत एका महानायका सारखं काम केलं. ते आणि त्यांची पत्नी माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत, अशी भावना नटराजन यांनी व्यक्त केली. (Faqir Chand Kohli, father of India’s software industry, passes away)

संबंधित बातम्या:

ऊर्जामंत्री ग्राऊंड झिरोवर, टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी

टाटा उद्योग समूह ‘अॅपल’मध्ये 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार!

टाटा मोटर्सची कमाल, 40 लाख गाड्यांच्या उत्पादनाचा विक्रम

(Faqir Chand Kohli, father of India’s software industry, passes away)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.